शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

शिफारशींअभावी गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित

By admin | Updated: October 27, 2015 01:13 IST

रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

पुणे : रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेकडून त्याकरिता शिफारशीच पाठविल्या जात नसल्याने वर्षभरात केवळ ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे सुविधा उपलब्ध असूनही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे.रुबी हॉस्पिटलमध्ये १२, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ तर एम्स हॉस्पिटलमध्ये १० बेड अशा एकूण २७ बेड दररोज गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी त्यांनी दहा हजार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात २०१४-१५ मध्ये रुबी हॉलमध्ये ३६ तर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १९ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना या सुविधेची माहितीच दिली जात नाही. त्यामुळे खासगी हॉस्पिटलचा फायदा होत आहे. यापूर्वी दोन वेळा याप्रकराविरुद्ध तक्रार करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आरोग्यप्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली. या वेळी विश्वास सहस्रबुद्धे उपस्थित होते.आरोग्य प्रमुखांच्या शिफारशीवरून गरीब रुग्णांवर या हॉस्पिटलनी मोफत उपचार करावेत, अशी तरतूद आहे. या योजनेची माहिती देणारे फलक या हॉस्पिटल बरोबरच महापालिका, सर्व क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने याठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली. महापालिकेकडे जर हे फलक लावण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, सजग नागरिक मंच स्वत:च्या पैशांमधून हे फलक उभारेल, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.गरीब रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा असूनही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचच्या वतीने १६ डिसेंबर २०१३ व १७ जुलै २०१४ रोजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. मात्र तरीही त्यांनी त्यामध्ये लक्ष घातले नाही, त्यामुळे आरोग्यप्रमुखांना आयुक्तही पाठीशी घालत आहेत, असा आरोप वेलणकर यांनी या वेळी केला.