शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रंगात रंगला देऊळवाडा

By admin | Updated: February 14, 2015 23:02 IST

ढोलताशाच्या गजरात मानकरी जमदाडे यांच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या अंगावर मानाच्या रंगाचे शिंपण (मारामारी) होऊन व फुलांची उधळण होत दहा दिवसांच्या यात्रेची सांगता झाली.

खळद/वीर : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे सुमारे अडीच लाख भाविकांच्या उपस्थितीत देऊळवाड्यात मानाच्या काठ्या, पालख्या यांच्या उपस्थितीत ढोलताशाच्या गजरात मानकरी जमदाडे यांच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या अंगावर मानाच्या रंगाचे शिंपण (मारामारी) होऊन व फुलांची उधळण होत दहा दिवसांच्या यात्रेची सांगता झाली. या वेळी संपूर्ण परिसर ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या भव्य गजराने दुमदुमून गेला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच लाखो भाविक मंदिरात मिळेल त्या ठिकाणी जागा धरून बसले होते. या वेळी राज्यभरातून तसेच कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित होते. सकाळी देवांना अभिषेक, नित्य पूजा आदी सर्व धार्मिक विधी पार पडले. १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे (कसबा पेठ), वीर, वाई, सोनवडी या मानाच्या काठ्या, पालख्या ढोलताशाच्या गजरात देऊळवाड्यात आल्या. मंदिराला एक प्रदक्षिणा झाल्यावर तलवार खेळण्याचा कार्यक्रम झाला व दुपारी दीड वाजता कासवाच्या दोनही बाजूंना दादा बुरुंगले व तात्या बुरुंगले यांच्या अंगात देवाचा संचार होऊन पंचमीपासून सुरू झालेली वार्षिक पीकपाणी भविष्यवाणी भाकणूक आजही झाली. यंदा पावसाला वेळेवर सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रात चारही खंडात चांगला पाऊस पडेल. हत्तीचा पाऊस समाधानकारक पडेल. खरीप हंगामातील पिके समाधानकारक येणार आहेत. वेळेवर पेरणी करेल तो शेरास सव्वाशेर पीक काढेल. बाजरीचे पीक जोमदार येईल, तर उत्तरा-पूर्वाही चार खंडांत पडतील. (वार्ताहर)४ गाईगुरांना, शेळ्या-मेंढ्यांना पुरेसा चारा उपलब्ध होणार, अशी भाकणूक केली. भाकणूक ऐकताना वातावरण एकदम भक्तिमय होऊन गेले होते. दुपारी दोन वाजता पाच मानकरी, शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्होटकर, ढवाण, दागिणदार, सालकरी, पाटील, देवस्थानचे पंच, भाविक यांच्या उपस्थित रंगाचे मानकरी माथेरानचे भारत जमदाडे,चंद्रकांत जमदाडे, मधुकर जमदाडे, रघुनाथ जमदाडे, नारायण जमदाडे यांनी मुख्य मानाच्या रंगाची शिंपण केली. या वेळी आपल्या अंगावर रंग पडावा यासाठी देऊळवाड्यात पश्चिम दरवाजाजवळ भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. ४दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व काठ्या, पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या ओट्यावर गेल्या व पुढे त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. या वेळी सर्व रस्ते बैलगाडी व तर वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते.