७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 19:42 IST2021-05-25T19:39:40+5:302021-05-25T19:42:05+5:30

महिला ठार झाल्यावर आरोपीने केला बलात्कार ; खेड तालुक्यातील घटना....

Demands of sexual relations to 71-year-old women ; brutal murdered due to refusing, khed taluka incidents | ७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना

७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना

चाकण : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील एका ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा राहत्या घरात तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर आणि चेहऱ्यावर जबरदस्त प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शरीर संबंधासाठी हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, चाकणपोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी एकास अटक केली.

सखुबाई बबन राऊत ( वय ७१ वर्ष, रा, कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्हयात अनिल सुदाम वाघमारे (वय ५२, रा. कुरकुंडी ता. खेड,) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विमल शिवाजीराव राउत यांनी फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी की या गुन्हयातील अनिल वाघमारे याने वयोवृध्द महिलेच्या घरात घुसून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता वाघमारे याने त्याांच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीसमोरील लोखंडी फुकणीने हल्ला करून ठार मारले. व ती मयत झाल्यावर तिच्यावर अनिल याने अतिप्रसंग केला असल्याचे तपासात समोर आले आहे. चाकण पोलिसांनी खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करून वाघमारे यास अटक केली.

Web Title: Demands of sexual relations to 71-year-old women ; brutal murdered due to refusing, khed taluka incidents