शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा लॉजिंग बंद करण्याची मागणी

By admin | Updated: July 19, 2014 03:38 IST

विनापरवाना लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून, विश्रांतवाडी (पुणे शहर पोलिसांनी) देहूफाटा ते इंद्रायणी नदीकिनारी असणाऱ्या लॉजवर छापा टाकून त्वरित कारवाई करण्याची मागणी

आळंदी देवाची : आळंदीत देहूफाटा (ता. हवेली) परिसरातील विनापरवाना लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून, विश्रांतवाडी (पुणे शहर पोलिसांनी) देहूफाटा ते इंद्रायणी नदीकिनारी असणाऱ्या लॉजवर छापा टाकून त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील महिलांनी व आळंदी नगर परिषदेच्या नगरसेविका, नगरसेवकांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देहूफाटा, वाय जंक्श्न चौकात अनेक लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून, याबाबत अनेक वेळा मार्चे, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी रास्ता रोको करून आंदोलने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पुणे श्हर पोलीस आयुक्त, विश्रांतवाडी पोलीस स्टेश्शन यांच्याकडे या विनापरवाना चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविषयी तक्रार अर्ज, निवेदने दिली. परंतु, सर्व निवेदनांना अक्षरश: केराची टोपली दाखविण्यात आली. या परिसरात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली, परिसरात राहणाऱ्या महिला यांना रस्त्याने पायी जाता-येताना दररोज गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाहीत. एकीकडे महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सर्व पक्षीय नेतेमंडळी भाषणात सांगतात. परंतु, या तीर्थक्षेत्र आळंदीत महिलांना, मुलींना अक्षरश: जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. देहूफाटा परिसरात गुंडप्रवृत्तीचे लोक महिलांची छेडछाड करतात. अश्लील भाषेत बोलतात. या संदर्भात विश्रांतवाडीच्या पोलिस निरीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यावर रोहिदास तापकीर, डी.डी. भोसले पाटील, शकुंतला रानवडे, अलका बवले, सुलोचना नेवसे, माधवी चोरडिया, प्रतिमा गोगावले, प्रदिप बवले, रमेश गोगावले, संतोष चोरडिया आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. देहूफाटा, वाय जंक्शन परिसरात प्रत्येक लॉजच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असून, वाहने उभी करण्यासाठी अंडरग्राऊंड मध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. या परिसरातील लॉजमध्ये अनेक जोडप्यांनी आत्महत्या केल्या आहेत. युवक व महिलांचे खून झाले आहेत. तर, काही जणांचे या अश्लील प्रकरणामुळे निष्पाप बळी गेलेले आहेत. (वार्ताहर)