शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस समिती अखेर बरखास्त

By admin | Updated: January 31, 2015 00:53 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट निवडणुकीतील बंडखोरी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला.

किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट निवडणुकीतील बंडखोरी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस समिती आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेल समित्या बरखास्त करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत (2008 ते 2013) बोर्डात अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता आली होती. मध्यंतरी काही काळ बोर्डाचा कारभार द्विसदस्य समितीमार्फत केला जात होता. त्यांनतर देहूरोड बोर्डाच्या सात जागांसाठी अकरा जानेवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षाच्या वतीने सात उमेदवार देण्यात आले होते. यातील एका उमेदवाराला ए बी फॉर्म देऊनही त्याने उमेदवारी अर्जात प्रथम पसंतीचे चिन्ह चुकीचे लिहिल्याने त्याला पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते. तर वॉर्ड क्रमांक सातमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली होती. बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली होती. तर काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर देहूरोडच्या सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रदीप बेंद्रे व देहूरोड शहर युवक अध्यक्ष धनराज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संबंधितांशी चर्चा करून येत्या आठवड्यात देहूरोड राष्ट्रवादीसाठी प्रभारी अध्यक्ष निवडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले. (वार्ताहर )