'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग
By नितीश गोवंडे | Updated: May 15, 2024 15:54 IST2024-05-15T15:54:15+5:302024-05-15T15:54:39+5:30
पैशाची काही कमी पडणार नाही असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून, स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तरुणीला करिअर बाद करण्याची धमकी दिली

'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग
पुणे : ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी डीप नेक व शॉर्ट ड्रेसमध्ये यायचे असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून करुन विनयभंग केला. याप्रकरणी ट्रेनिंग सेंटरच्या मालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ मे ते १४ मे या कालावधीत कोथरूड येथील गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर येथे घडला.
याबाबत निगडी परिसरातील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेश गंगाधर कनेरी (५१, रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कनेरी याचे कोथरूड येथे गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पिडित तरुणी नोकरी करते. मंगळवारी (ता. १४) फिर्यादी कामावर आल्या असता आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आली, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डीप नेक व शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का? तसेच माझ्यासोबत बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये येशील का? दुसऱ्या मुली माझ्यासोबत येतात, पैशाची काही कमी पडणार नाही असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन करिअर बाद करण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काटकर करत आहेत.