शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सदनिका विक्रीचा निर्णय हा बिल्डर धार्जिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

पुणे : महापालिकेच्या मालकीच्या सदनिका विक्री करण्याचा निर्णय हा सत्ताधारी पक्षाने केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी घेतला आहे़ प्रत्येक ...

पुणे : महापालिकेच्या मालकीच्या सदनिका विक्री करण्याचा निर्णय हा सत्ताधारी पक्षाने केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी घेतला आहे़ प्रत्येक सदनिकेमागे एक रक्कम निश्चित करून या सदनिका विक्रीचा घाट घातला गेला असून, सत्ताधारी भाजपचा हा गेल्या साडेचार वर्षांतील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. या प्रस्तावावर फेरप्रस्ताव दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

जगताप गुरुवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत बोलत होते. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यावेळी उपस्थित होत्या. महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने, सदनिका विक्रीतून व अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देऊन २०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल व त्यातून शहराचा विकास करता येईल, असा बनाव सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पुणे महापालिका राज्यातील ‘अ’ दर्जाची असून, महापालिकेकडे २ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी बँकेत आहेत. विकासासाठी या ठेवींवर कर्जरोखे घ्यावेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, महापालिकेला गेल्या कित्येक वर्षांत मिळालेल्या सदनिका केवळ दोन महिन्यांत विक्री करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून सत्ताधारी पक्षाने तो मान्य करून घेतला. ही पुणेकरांची फसवणूक असल्याचे जगताप म्हणाले.