शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

‘राजधानी’प्रमाणेच दौडणार ‘डेक्कन क्वीन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 03:50 IST

मुंबई व पुण्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या दख्खनच्या राणीला म्हणजेच डेक्कन क्वीनला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे नवीन ‘लिंक हाफमन बुश’ (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत.

पुणे : मुंबई व पुण्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या दख्खनच्या राणीला म्हणजेच डेक्कन क्वीनला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे नवीन ‘लिंक हाफमन बुश’ (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. तसेच ‘पूल अँड पुश’ हे तंत्रही डेक्कन क्वीनसाठी वापरले जाणार असल्याने गाडीचा वेग वाढणार आहे. त्यामुळे ही गाडी किमान अर्धा तास लवकर पोहचणार असून, प्रवाशांचा प्रवासही पूर्वीपेक्षा अधिक सुखकर होणार आहे. दि. १ जूनपासून नव्या स्वरूपातील डेक्कन क्वीन धावेल, असे सूत्रांनी सांगितले.रेल्वेचे पारंपरिक डबे बदलून त्याजागी ‘एलएचबी’ प्रकारातील नवीन डबे वापरण्यास मागील काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे. या डब्यांची रचना तसेच अंतर्गत सुविधा पारंपरिक डब्यांच्या तुलनेत चांगल्या असतात. सध्या दुरांतो, शताब्दी, हमसफर एक्स्प्रेसमध्ये हेच डबे वापरले जातात. त्यामधील तंत्रामध्ये अनेकवेळा बदलही झाले आहेत. त्यात ‘पूल अँड पुश’ या तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. या तंत्रामध्ये गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिनचा वापर केला जातो. सध्या मध्य रेल्वेमध्ये एलएचबी डब्ब्यांसह ‘पूल अँड पुश’ हे तंत्र असलेली मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ही एकमेव गाडी आहे. त्यानंतर आता हा मान डेक्कन क्वीनला मिळणार असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.‘डेक्कन क्वीन’चे सध्याचे सर्व डबे जुन्या रचनेतील आहेत. हे सर्व डबे बदलून त्याजागी ‘एलएचबी’ हे आधनिक स्वरूपाचे डबे बसविले जाणार आहे. त्यामध्ये ‘पूल अ‍ॅन्ड पुश’ हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. पूर्वी खंडाळा घाट चढण्यासाठी गाडीला अधिक वेळ लागत होता. नवीन तंत्रामुळे हा वेळ कमी लागणार आहे. तसेच थांबलेल्या गाडीला कमी वेळेत अधिक वेग मिळणे, वळणावरही वेग अधिक राखण्यासाठी मदत मिळणार आहे. गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे पुढून आणि मागील बाजूनेही गाडीला वेग मिळेल. त्यामुळे गाडीच्या वेळेमध्ये सुमारे ३० ते ३५ मिनिटांचा फरक पडणार आहे.एलएचबी, पूल अँड पुशचे फायदेवेळेत ३० ते ३५ मिनिटांची बचतआसन व्यवस्था आरामदायीई-टॉयलेटची सुविधामाहितीसाठी डिजिटल फलकडब्यांचे झटके जाणवणार नाहीतगाडीचा वेग स्थिर ठेवण्यास मदतएकूण डबे - १७ (१ डायनिंग कार, ५ एसी, ९ आरक्षित, २ सर्वसाधारण)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे