शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: March 15, 2017 03:24 IST

मित्रांसमवेत भराडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक घोड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल शंकर हिंगे (वय ३३, रा. खालचा शिवार, अवसरी बुद्रुक) या तरुणाचा

मंचर : मित्रांसमवेत भराडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक घोड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल शंकर हिंगे (वय ३३, रा. खालचा शिवार, अवसरी बुद्रुक) या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एनडीआरएफच्या टीमने २४ तासांनंतर स्वप्निल हिंगे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.अवसरी बुद्रुक गावाचा खालचा शिवार येथील स्वप्निल शंकर हिंगे हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. स्वप्निलचे मुंबई येथून आलेले मित्र व तो घोडनदीतील भराडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पोहण्यासाठी गेले. भराडी बंधारा पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे. बंधाऱ्याचा खालील बाजूस वाहते पाणी असून हे तरुण तेथील पाण्यात काल सायंकाळी साडेपाच वाजता पोहण्यासाठी गेले. स्वप्निलचे मित्र पोहून बाहेर आले. मात्र, स्वप्निल पाण्याच्या भोवऱ्यात अडकला. पाण्यात बुडालेला स्वप्निल बाहेर न आल्याने मित्रांनी आरडाओरडा केला. स्वप्निलच्या घरी या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी आले. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात बुड्या मारून स्वप्निलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.रात्री अंधार पडल्यावर शोधकार्य थांबविण्यात आले. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक मच्छीमारांनी शोधकार्यात सहभाग घेतला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी एनडीआरएफच्या टीमशी संपर्क साधल्यानंतर दुपारी एनडीआरएफची टीम भराडी येथील बंधाऱ्यावर आली. इन्स्पेक्टर एस. बी. इंगळे यांच्यासह १२ जवानांनी शोधकार्याला सुरुवात केली. बोटीच्या साह्याने आॅक्सिजन मास्क घातलेला जवान पाहण्यात उतरून स्वप्निल हिंगे याचा शोध घेत होता.