शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 13, 2015 06:24 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी काळभोर येथे घडली. ही घटना सिद्राममळा परिसरात घडली. या घटनेमध्ये रेखा तानाजी काळभोर (वय ५०, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) या मृत्युमुखी पडल्या आहेत. दहा मार्च रोजी लोणी काळभोर परिसरात वादळी-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे झाडे उन्मळून पडली होती, तर वीजवाहक तारा तुटल्या होत्या. तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीने वेळीच दक्षता न घेतल्याने, तारा जागोजागी तशाच पडून होत्या. अकरा मार्च रोजी दुपारी नेहमीप्रमाणे रेखा काळभोर या मालकीच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वीजवाहक तार तेथे तुटून पडली होती. त्या तारेला स्पर्श होताच विजेचा झटका बसून त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.या घटनेची माहिती लवकर इतरांना समजली नाही. त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्याचे कुटुंबीय सायंकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. त्या वेळी सदर प्रकार रात्री उघडकीस आला. (वार्ताहर)