शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी नदीवरील बंधारे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST

—————————— वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी पिण्याच्या ...

——————————

वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. बंधारे गेले आठ ते दहा दिवसापासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांना ' धरण उशाला कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

येडगाव धरणापासून वैशाखखेडे, कांदळी, वडगाव कांदळी कोल्हापूर पध्दतीचे हे बंधारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत. पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे बंधारे सध्या कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. या वर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे धरणाच्याजवळ हे बंधारे असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैशाखखेडे, कांदळी, वडगाव कांदळी या बंधाऱ्यामधून नगदवाडी, कांदळी, पिंपळवंडी, पिंपरीपेंढार, वडगाव कांदळी, साळवाडी, आळे या गावांना उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला पाणी पुरविण्याचे महत्त्वाचे साधन झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उपसा जलसिंचन योजना राबविल्या आहेत. वडगाव कांदळी, कांदळी वैशाखखेडे या तीन बंधाऱ्यातून सुमारे २५० ते ३०० विद्युतमोटरच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होत असतो. गेल्या आठ दिवसापासून बंधाऱ्यातील पाणी संपल्याने नदीपात्रातील बरेचसे विद्युत पंप बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाटबंधारे विभागाने ताबडतोब या बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

—-

चौकट

उन्हाळ्यातही अवकाळीने दिलासा

भर उन्हाळ्यात सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने बंधाऱ्यातील पाणी संपूनही या अवकाळी पावसाने शेती पिकांची व चारापिकांची पाण्याची आठ दिवसांची व्यवस्था झाली आहे. जर आठ दिवसात बंधारे भरले नाही तर शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेली चारा पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोट

गेल्या आठ दिवसापासून नदीवरील मोटारी पाणी नसल्याने बंद आहेत. उन्हाळ्यामुळे विहिरीही कोरड्या असल्यामुळे पूर्णपणे बांधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. बंधारेही कोरडे पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.आठ दिवसात नदीला पाणी आले नाही तर चारापिके पूर्णपणे जळून जातील.

- नामदेव पाचपुते,

शेतकरी, वडगाव कांदळी.

—-

फोटो क्रमांक: ०३ वडगाव कांदळीधरण

फोटो ओळ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर ) येथील कुकडी नदीवरील कोरडा पडलेला के. टी. बंधारा