शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

भोरमध्ये ‘पार्टी’वाल्यांची दादागिरी!

By admin | Updated: September 22, 2014 05:39 IST

निवंगुणी (जयतपाड, भोर) येथे पार्टीवाल्याकडून गावाच्या पाणंद रस्त्यावर गेट बसवल्याच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शंकर कोंडिबा मराठे (वय ७७) यांचा मृत्यू झाला.

भोर : निवंगुणी (जयतपाड, भोर) येथे पार्टीवाल्याकडून गावाच्या पाणंद रस्त्यावर गेट बसवल्याच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शंकर कोंडिबा मराठे (वय ७७) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वा. घडली. आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.याबाबतची माहिती अशी, निवंगुणी हे २५ घरांचे व १०० लोकवस्तीचे गाव आहे. ३ वर्षांपूर्वी गावातील २० एकर जमीन कुलमुखत्यारपत्र करून विक्री केली. ही जमीन सीमा सचिन मुंगळे (रा. पुणे) यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी गावच्या स्मशानभूमीकडे व धरणाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर गेट लावून रस्ता बंद केला. यामुळे जनावरे पाण्यावर घेऊन जाणे, मृतदेह अंत्यविधीला नेणे, गणेशविसर्जन करणे याची लोकांची अडचण झाली. यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करून रस्ता खुला करण्याची मागणी केली.त्यानंतर तहसीलदारांनी पाहणी केली असता, सदरचा पाणंद रस्ता गट नं. १-६ मध्ये गाव नकाशावर असल्याने गेट काढून रस्ता खुला करून दिला. सदरचा रस्ता खुला झाल्याचा राग मनात धरून पार्टीवाले मुंगळे यांनी गावातील दिनेश लाळे, बापू जाधव, अनिल कोळपे, अनिल आडुळकर यांच्या विरोधात गेट चोरल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंगळे यांनी तेच गेट काल ३ वा. पुन्हा पाणंद रस्त्यावर बसवल्याने ग्रामस्थांनी त्यांना विचारले, गेट चोरीला गेले होते; मग परत कसे आले, यातून वादावादी झाली. मुंगळे यांनी तक्रार केल्यावर पोलीस गावात येऊन चार तरुणांना घेऊन गेल्यावर तोंडाला रुमाल बांधलेल्या लोकांनी शंकर मराठे यांच्या घरात घुसून अंधाराचा फायदा घेत मराठे यांना, त्यांच्या भावाला, मुलगीला मारहाण केली. यात शंक र मराठे यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ७.३० वा. घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी रात्री ११ वा. फिर्याद दिली. मुंगळे यांच्या लोकांनीच मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले; मात्र आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास लोकांनी विरोध केला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मुंगळे यांनीही ग्रामस्थांनी त्यांच्या मानसांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. (वार्ताहर)