शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 'या' भागात 'येलो अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 19:50 IST

‘तौत्के’ चक्रीवादळ गोवा व दक्षिण कोकणाच्या किनारपट्ट्याजवळून पुढे खोल समुद्राच्या दिशेने वळणार आहे.

ठळक मुद्देविदर्भात अनेक जिल्ह्यात रविवारी पावसाची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळ शनिवारी रात्रीनंतर कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर जाण्यास सुरुवात होणार असली तरी त्याचा परिणाम दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

‘तौत्के’ चक्रीवादळाचा शनिवारी सकाळी ताशी ७ किमी होता. आता दुपारी त्याने ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे. तेव्हा ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२०, गुजरातमधील वेरावळपासून ८५० किमी दूर होते. शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून वार्‍याचा वेग ताशी ९५ ते १०५ किमीवर पोहचला आहे. उद्या रविवारी सायंकाळी या चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यावेळी त्याच्या वार्‍याचा वेग ताशी १२५ ते १४५ किमीपर्यंत पोहचणार आहे. रविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी हे चक्रीवादळ समुद्रातच अति वेगवान होत गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी अथवा दुपारी ते गुजरातमधील पोरबंदर आणि नालिया दरम्यान जमिनीवर धडकणार आहे. जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होत जाणार असून १९ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत त्याचा परिणाम जाणवत राहणार असून हे चक्रीवादळ गुजरातमधून पुढे राजस्थान व पाकिस्तानपर्यंत वाटचाल करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

हे चक्रीवादळ गोवा व दक्षिण कोकणाच्या किनारपट्ट्याजवळून पुढे खोल समुद्राच्या दिशेने वळणार आहे. यादरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तसेच सह्याद्री घाट परिसरात १६ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, पालघर जिल्ह्यात १७ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गुजरातमधील सौराष्टातील अनेक जिल्ह्यात १६ मेच्या दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ मे रोजी सौराष्ट्र व कच्छ आणि दीव परिसरत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जुनागड, गीर सोमनाथ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

कोचीत दिवसात २०९ मिमी पाऊस

या चक्रीवादळामुळे केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोची येथे एका दिवसात २०९ मिमी पावसाची नोंद झाली असून मे महिन्यात एकाच दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. याशिवाय पेमडे २०८, देवरा १३७, पेरियार १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात गोव्यातील दाभोलिम, महाबळेश्वर येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. 

उत्तर पूर्व राजस्थान व लगतचा भाग ते मराठवाडा दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना व विजांसह कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

शनिवारी दिवसभरात कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. रत्नागिरी येथे १०, कोल्हापूर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दिवसभर आकाश ढगाळ होते. 

घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यतापुणे शहरात रविवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळweatherहवामानRaigadरायगडSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी