दुचाकीस्वार तरुणीकडील मोबाईल संच हिसकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:54+5:302021-09-25T04:09:54+5:30

पुणे : शहरात मोबाईल हिसकावण्याचे प्रमाण वाढले असून, विमानतळ रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणीकडील मोबाइल संच लांबविण्यात आल्याची घटना ...

The cyclist snatched the mobile set from the girl | दुचाकीस्वार तरुणीकडील मोबाईल संच हिसकावला

दुचाकीस्वार तरुणीकडील मोबाईल संच हिसकावला

पुणे : शहरात मोबाईल हिसकावण्याचे प्रमाण वाढले असून, विमानतळ रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणीकडील मोबाइल संच लांबविण्यात आल्याची घटना घडली.

याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती मध्यरात्री दुचाकीवरून लोहगावकडे निघाली होती. विमानतळ रस्त्यावर दुचाकीस्वार तरूणी पाठोपाठ चोरटे आले. चोरट्यांनी तिला धक्का मारला. युवतीचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर चोरटे तरुणीच्या हातातील मोबाईल संच हिसकावून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी तसेच दुचाकीस्वारांकडील मोबाईल संच हिसकावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मध्यंतरी विमाननगर भागात मोबाईल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी पकडले होते. चोरट्यांकडून चौदा मोबाईल संच जप्त करण्यात आले होते.

Web Title: The cyclist snatched the mobile set from the girl