पिंपरी महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला; तब्बल ५ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:20 PM2021-03-10T15:20:37+5:302021-03-10T15:25:21+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात परदेशी हॅकरचा हात असल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Cyber attack on 27 servers of Pimpri Municipal Smart City project; Loss of Rs 5 crore | पिंपरी महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला; तब्बल ५ कोटींचे नुकसान

पिंपरी महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला; तब्बल ५ कोटींचे नुकसान

Next

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला केल्याची घटना घडली आहे.  रन्समवेअरने अटॅक केल्याचं उघड झाल आहे. त्यातील डेटा इनक्रिप्ट केला  असून, तो हवा असल्यास अज्ञात बिटकॉइनची मागणी हॅकरकडून केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात परदेशी हॅकरचा हात असल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेकी करून हा हल्ला करण्यात आला आहे, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या अस्तित्व हॉल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाची नुकतीच सुरुवात झाली होती. अधिकाऱ्यांनी पूर्ण काम सुरू केलं नव्हते. सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हर मधून डेटा इनक्रिप्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर हल्ला कडून माहिती चोरल्यामुळे ५ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. चोरी केलेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असे सायबर पोलिसांनी सांगितले आहे. हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून तो पुन्हा त्यांनाच डिस्क्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत आहेत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आहे. या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे.

पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी घडला आणि या प्रकरणी मंगळवारी तक्रार देण्यात आली. त्यानंतर घटना उजेडात आली. मात्र, तक्रार देण्यास विलंब का झाला, या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामुळे तब्बल ५ कोटींचे नुकसान झाल्याचं ही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Cyber attack on 27 servers of Pimpri Municipal Smart City project; Loss of Rs 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.