शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सलग चौथ्या दिवशी यवतमध्ये जमावबंदी व कडकडीत बंद; गावात शांतता परंतु सतर्कतेचा माहोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:55 IST

पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

यवत : यवत येथे शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) रोजी उसळलेल्या दंगलीनंतर गावात कडकडीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सलग चौथ्या दिवशी आज (दि. ४ ऑगस्ट) गावातील बाजारपेठ पूर्णतः बंद राहिली असून संपूर्ण परिसरात शांतता असली तरी पोलिसांकडून अत्यंत सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.           पोलिसांनी त्वरीत कारवाई करत गावात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(१) नुसार जमावबंदी लागू केली असून कोणालाही अनावश्यक गर्दी करण्यास, गटागटाने फिरण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी जमाव करणे यास बंदी घालण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस दलाची तैनाती करण्यात आली असून गावाच्या प्रमुख चौकांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.             पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये गंभीर व कठोर कलमे लावण्यात आली असून त्यामुळे आरोपींच्या गटांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सध्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावात शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकagitationआंदोलनSocial Mediaसोशल मीडिया