शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

विकृतीचा गाठला कळस, ६५ वर्षाच्या ज्येष्ठाने भटक्या कुत्र्यावर केला अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:07 PM

किळसवाणा प्रकार गेल्या ऑक्टोबरपासून होता सुरु, एका तरुणीने व्हिडिओ शुटींगच्या माध्यमातून घटना आणली उघडकीस

ठळक मुद्देरात्रपाळीची ड्यूटी करताना केले होते अनैसर्गिक कृत्य

पुणे: पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या विकृतीची घृणास्पद प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी या ६५ वर्षाच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा किळसवाणा प्रकार गेल्या ऑक्टोबरपासून सुरु असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

मॉडेल कॉलनीमधील मिलेनियम सोसायटीमध्ये हा ६५ वर्षाचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने रात्रपाळीची ड्यूटी करत असताना भटक्या कुत्र्याला पकडले. व त्याला बाजूला नेऊन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार सुरु असताना तरुणीला जाग आली. तेव्हा तिने हा सर्व प्रकार पाहिला. तिने प्राणी मित्रांना फोन करुन त्यांची माहिती दिली. त्यांनी तिला या प्रकाराचे व्हिडिओ शुटिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ही तरुणी त्या सुरक्षा रक्षकावर लक्ष ठेवून होती. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या त्याने एका भटक्या कुत्र्याला उचलून पार्किंगमध्ये नेले. तेथे त्याने त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या तरुणीने त्याचे व्हिडिओ शुटिंग केले. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारArrestअटकPoliceपोलिस