शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By प्रशांत बिडवे | Published: April 14, 2024 5:55 PM

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे

पुणे : देशातील केंद्रीय, राज्य विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आयाेजित सीयुईटी पीजी- २०२४ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा १५७ विषयांसाठी ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे.            केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयाेगाने केंद्रीय, राज्य तसेच खाजगी, अभिमत विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि स्वायत्त महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी काॅमन युनिव्हर्सिटी एन्ट्रस टेस्टचे सीयुईटी पीजी प्रवेश परीक्षा बंधनकारक केली आहे. सीयुईटी पीजी चे २०२२ पासून सुरूवात झाली. पहिल्या वर्षी २०२२ मध्ये ३ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर २०२३ मध्ये ५ लाख ४० हजार तर २०२४ मध्ये ७ लाख ६८ हजार ४१४ जणांनी नाेंदणी केली त्यातील ७५ टक्के म्हणजेच ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा दिली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएच्या वतीने दि. ११ ते २८ मार्च या कालावधीत भारतासह परदेशातील मनामा, दुबई, काठमांडू, मस्कट, रियाध, ओट्टावा, अबुधाबी, व्हिएन्ना आणि कतार आशा एकुण २६२ शहरातील ५७२ सेंटर्सवर ऑनलाईन माध्यमातून सीयुईटी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. केंद्रीय, राज्य, खाजगी आणि इतर विद्यापीठे असे एकुण १९० विद्यापीठांनी सीयुईटी- २०२४ अंतर्गत प्रवेशासाठी नाेंदणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षाTeacherशिक्षकSocialसामाजिक