शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दुचाकीच्या डिक्कीत दागिने सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 9:16 PM

चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी चंदननगर भाजी मंडईत येणार असल्याची माहिती मिळाली.

पुणे : नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यात घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने आढळून आले.

सुमित मोहन शिंदे (वय २२, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) आणि ऋतिक दत्ता सारगे (वय १९, रा़ सुरक्षानगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी चंदननगर भाजी मंडईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे जण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी थोड्याच अंतरावर पाठलाग करुन त्यांना पकडले़ त्यांच्याकडील दुचाकीची तपासणी केली.  दुचाकीच्या डिक्कीत ४४ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. त्याविषयी चौकशी केल्यावर त्यांनी सहा ते सात दिवसांपूर्वी गाडीवरुन दुपारच्या वेळी खराडी बायपास रोडवरील सोसायटीमधील एका बंद फ्लॅटचे दरवाजाचे लॉक व कडी कोयंडा तोडून एका बॅगेमधील सोन्या चांदीचे दागिने चोरले असल्याची कबुली दिली. 

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सहा पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस अंमलदार राजेश नवले, अमित जाधव, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांनी केलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकjewelleryदागिने