शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एटीएसच्या उपनिरीक्षकासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:12 IST

रोहिणी माने व सुभाष यादव यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले आहे़.

ठळक मुद्देरोल नंबर १८ च्या नायकाचा केला छळ : सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : विनयभंगाची तक्रार करुन रोल नंबर १८ च्या नायकाकडून खंडणी उकळणाऱ्या एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षक, अभिनेत्री आणि सराईत गुन्हेगार अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तर, सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे (रा़ पर्वती पायथा, सहकारनगर) याला अटक करण्यात आली़  दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलीस लाईन), राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर), रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व सारा श्रावण उर्फ सारा गणेश सोनवणे (रा. मुंबई सध्या दुबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील ऑफिसमध्ये घडला. यादव व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. रोहिणी माने व सुभाष यादव यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले आहे़. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिणी ही तेव्हापासून आपल्याशी लग्न कर, यासाठी यादव यांच्या मागे लागल्या होत्या़. पण यादव यांनी प्रतिसाद न दिल्याने रोहिणी यांनी यादव यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दिली़ होती़. यादव यांचा नृत्याचा एक व्हिडिओ माने हिने व्हायरल केला होता़. त्यावरुन यादव यांनी फिर्याद दिली होती़. तेव्हा रोहिणी हिने पोलीस उपनिरीक्षक टेकाळे याची मदत घेतली़ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता़. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मिटवण्यासाठी राम जगदाळे याने सुभाष यादव यांना कार्यालयात बोलवून घेतले. तेथे त्याला व त्याच्या नातेवाईकांना तीन तास अटकावून ठेवून जबरदस्तीने रोहिणी माने हिचे पाय धरून माफी मागण्यास लावली व त्याचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये अमोल टेकाळे यांनी स्विकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने राम जगदाळे, अमोल टेकाळे व रोहिणी माने यांनी संगनमत करून सारा सोनवणे हिच्या मार्फतीने पाय धरून माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल  मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच टेकाळे याने त्याच्याजवळील पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची, अ‍ॅसिड टाकून मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. सुभाष यादव आणि रोहिणी माने हे दोघे १७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या रोल नं. १८ चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री आहेत. रोहिणीनीची सारा सोनवणे ही मैत्रीण आहे. तर राम जगदाळे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.या प्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcinemaसिनेमाMolestationविनयभंग