बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:47 IST2025-05-31T09:45:40+5:302025-05-31T09:47:42+5:30

गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती

crime news Policeman harasses wife while running for bullet train | बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

दौंड : बुलेट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन म्हणून विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी राज्य राखीव पोलिस बल गट क्र.७ चे जवान किरण मोरे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी वैष्णवी किरण मोरे ( वय २५, मूळ रा. मियाटाकळी, ता. राहुरी, जि. पुणे, सध्या राहणार पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी पती किरण मोरे, सासू सुमन मोरे, सासरे सुरेश मोरे, दीर नितीन मोरे (सर्व रा. टाकळी मिया, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ७ येथे किरण मोरे हा पोलिस जवान म्हणून सेवेत आहे. दरम्यान, तो आणि त्याची पत्नी वैष्णवी आणि एक चार वर्षांचा लहान मुलगा असे दौंड येथे राहत होते.

बऱ्याचदा सासू-सासरे आणि दीर देखील अधूनमधून दौंडला येत होते. यावेळी वैष्णवीचा छळ केला जात होता. तुझ्या वडिलांकडून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती, असे वैष्णवी मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: crime news Policeman harasses wife while running for bullet train