Video: 49 गुंठ्यांत 18 रो हाऊस..! कोरेगाव पार्कमधील कोट्यवधींच्या संपत्तीमुळे अशोक खरातचा सीए रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:44 IST2026-03-31T12:42:34+5:302026-03-31T12:44:42+5:30
भोंदू बाबा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास तीव्र; सीए प्रकाश पोफळे रडारवर

Video: 49 गुंठ्यांत 18 रो हाऊस..! कोरेगाव पार्कमधील कोट्यवधींच्या संपत्तीमुळे अशोक खरातचा सीए रडारवर
पुणे- भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता आर्थिक घोटाळ्याची नवी कलाटणी मिळत आहे. अशोक खरातशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी पोलिसांनी वेगाने सुरू केली असून, त्यात भोंदू बाबा खरातचा सीए प्रकाश पोफळे हेही तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे अधिकच्या माहितीनुसार, प्रकाश पोफळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः कोरेगाव पार्क या पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील मालमत्तेच्या व्यवहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 150 कोटींची मालमत्ता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
कोरेगाव पार्क परिसरात सुमारे 49 गुंठे जागेवर तब्बल 18 रो हाऊस पोफळे यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तेची अंदाजे किंमत 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे. मात्र, कागदोपत्री ही मालमत्ता 2024 मध्ये फक्त 19 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजारभाव आणि दाखवलेल्या किंमतीत मोठी तफावत असल्याने व्यवहार संशयास्पद मानला जात आहे. या मालमत्तेच्या परिसरात देशातील अनेक नामांकित उद्योगपतींचे बंगले आहेत.दरम्यान, सीए प्रकाश पोफळे यांच्याकडे एवढा मोठा निधी कुठून आला? या व्यवहारामागे अशोक खरात यांचा पैसा आहे का? की यामध्ये राजकीय आर्थिक साखळीचा सहभाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.