Pune Crime: पोलिस अधिकाऱ्यांना ओळखतो म्हणत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: November 27, 2023 13:01 IST2023-11-27T12:59:36+5:302023-11-27T13:01:08+5:30

याप्रकरणी बहिण-भावावर गुन्हा दाखल केला आहे....

Crime against two who molested a woman claiming to know the police officers | Pune Crime: पोलिस अधिकाऱ्यांना ओळखतो म्हणत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा

Pune Crime: पोलिस अधिकाऱ्यांना ओळखतो म्हणत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा

पुणे :पोलिस दलातील मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना ओळखतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखतो असे म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केला. तसेच महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. हा प्रकार वडगाव शेरी येथे सप्टेंबर महिन्यात सकाळी १० च्या सुमारास आणि शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास पीडित महिला राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी बहिण-भावावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. ज्योतीन्दर जयंतीलाल पटेल आणि त्याची बहिण (रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाऊ-बहिणीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी वडगाव शेरी परिसरातील एकाच सोसायटीत राहतात. आरोपी तरुणीने पीडित महिलेच्या पतीचा सोसायटीच्या पार्किंगमध्ये व्हिडिओ बनवला होता. याचा जाब विचारला असता आरोपी ज्योतीन्दर याने पीडितेला दमदाटी करत ‘पोलिस दलातील मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना मी ओळखतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील ओळखतो, माझे कुणी काही करु शकत नाही’ असे म्हणत महिलेला अश्लील शिवीगाळ करुन त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. तसेच फिर्यादी यांच्या दंडाला ओढून गैरवर्तन करुन विनयभंग केला. आरोपींनी पीडितेच्या पतीला देखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.

Web Title: Crime against two who molested a woman claiming to know the police officers