A crime against two children who refuse to care taking of mother | जन्मदात्या आईचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल
जन्मदात्या आईचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल

कळस :जन्मदात्या आईला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या ,तिचा संभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटच्या दोन्ही  मुलाकडुन हा अनुभव आल्यावर दुदैर्वी आईने पोलिसांकडे दाद मागितली.त्यानंतर त्या दोन्ही मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.लाकडी (ता. इंदापूर) येथे वयोवृद्ध आई मुलासमवेत वास्तव्यास आहे.मुलावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभद्राबाई नामदेव वणवे (वय ७०) यांनीयाबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादी महिला वयोवृद्ध असून त्यांचे जीवनपूर्ण मुलांवर अवलंबून आहे. मुलगा त्यांचा कोणत्याही प्रकारे व्यवस्थितरित्या पालन पोषण करीत नाही .तसेच त्यांना  वेळेवर जेवण देत नाही. कपडे, औषधपाणी खचार्साठी पैसे देत नाही. वेळो वेळी मारहाण करतो, तू बसून राहुनको. घरातील कामे कर तेव्हा तुला जेवण मिळेल, असे म्हणून मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच वृद्धापकाळात वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सांभाळ व पालन पोषण करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरुन बापू नामदेव वणवे,राजेंद्र नामदेव वणवे (रा. लाकडी, ता इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा  पुढील तपास पोलीस हवालदार वसंत वाघोले हे करत आहेत.

Web Title: A crime against two children who refuse to care taking of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.