शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स.प. महाविद्यालयाला दणका

By admin | Updated: February 23, 2015 00:49 IST

अकरावी प्रवेशाचा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेच्या वाटपात झालेला गैरव्यवहार अशा कारणांमुळे चर्चेत असलेल्या स. प.

पुणे: अकरावी प्रवेशाचा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेच्या वाटपात झालेला गैरव्यवहार अशा कारणांमुळे चर्चेत असलेल्या स. प. महाविद्यालयाने अर्थशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकाची महाविद्यालयामध्ये बेकायदा नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकाची मान्यता रद्द करण्याचे आदेश देऊन महाविद्यालयाला आणखी एक दणका दिला आहे.स. प. महाविद्यालयात प्रा. सुनील शिंदे यांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, महाविद्यालय प्रशासनाने या प्राध्यापकाची नियुक्ती पूर्णवेळ असल्याचा अहवाल विद्यापीठाला सादर केला. त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे तयार केली. परंतु, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक- शिक्षकेतर संघटनेतर्फे विद्यापीठाकडे तक्रार देण्यात आली. तक्रारीनुसार विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याची समिती स्थापन केली. समितीने सर्व बाबी तपासून सुनील शिंदे यांची २००३-२००४ ते २०१० - २०११ पर्यंतची पूर्णवेळ व्याख्याता पदाची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे. शिंदे पूर्णवेळ व्याख्याता नसताना त्यांना विद्यापीठाकडून मान्यतापत्रे कशी देण्यात आली, असा सवालही या समितीने उपस्थित केला आहे. शैक्षणिक संस्थेतर्फे हेतुपुरस्सर सोयीच्या तारखा दाखवून कामावर रुजू होण्यासंदर्भातील बेकायदेशीर अहवाल तयार केला होता.