शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण

By admin | Updated: September 22, 2014 05:34 IST

बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या दोन तगड्या इच्छुकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी मोकळी वाट करून दिली

पुणे : बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या दोन तगड्या इच्छुकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी मोकळी वाट करून दिली. हवेली-शिरूर मतदारसंघातून बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले प्रदीप कंद आणि खडकवासला मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत असलेले शुक्राचार्य वांजळे यांना अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपद दिले गेल्याने हवेली तालुक्यात प्रथमच दोन्ही पदे आली.कंद यांनी हवेली शिरूर मतदारसंघातून लढण्यासाठी अडीच वर्षांपासून तयारी चालविली होती. विकासकामांच्या तुलनेत विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावर कडी करून ते राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंंवा अन्य पक्ष यांचा पर्याय पाहत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कंद यांनी मागणी केली नव्हती किंवा अर्जही केला नव्हता. विश्वास देवकाते, निवृत्ती गवारे, शांताराम इंगवले अशा ९ प्रबळ इच्छुकांवर मात करून त्यांना अध्यक्षपदासाठी संधी देण्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हवेली शिरूर मतदारसंघातील गणित होते. कंद यांनी उमेदवारी दिली असती तर हवेलीच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला विरोध सहन करावा लागण्याची शक्यता होती़ कंद यांना जिल्ह्याचे नेतृत्व सोपवून हवेली शिरूरच्याच नव्हे, जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे.शुक्राचार्य हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे बंधू असून, खडकवासला मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत लढण्याच्या पवित्र्यात होते. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या वहिनी हर्षदा वांजळे यांनी निकराची झुंज दिली होती. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे २६ इच्छुकांनी उमेदवारीच्या मागणीमुळे पेच झाला होता. शुक्राचार्य वांजळे हे त्यातील प्रमुख दावेदार होते. त्यांना उपाध्यक्षपदी संधी देऊन राष्ट्रवादी खडकवासला मतदारसंघातील स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न चालविल्याचे सांगितले जाते.