शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई नक्की मागायची कोणाकडे?

By admin | Updated: February 24, 2015 00:22 IST

कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये १६ शेतकऱ्यांचे ४२ एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसाला आग उच्चदाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे असे प्रश्न उपस्थित करून महावितरण व महापारेषण जबबादारी एकमेकांवर टाकत आहेत. त्यामुळे भरपाई नक्की कोणाकडे मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.जळीत उसाची साखर कारखान्यांनी त्वरित तोडणी करण्याची व जळीत उसाच्या बिलामध्ये कोणतीच कपात करू नये, अशी मागणी मधुकर गव्हाणे यांनी केली आहे . आग नक्की कशामुळे लागली, याचा अहवाल दोन-तीन दिवसांत वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याचे विद्युत निरीक्षक एम. एस. जगताप यांनी सांगितले.नुकसानीचा पंचनामा कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व कृषी सहायक श्रीमती आरती कारंडे यांनी केला. महावितरणने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले; तर आग उच्च दाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याबाबत हे दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापेक्षा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अशा सूचना केल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले. जळालेल्या उसाची त्वरित तोडणी करण्यासाठी कारखान्यामार्फत हार्वेस्टर मशिनची तत्काळ उपलब्धता करून सर्व बाधित शेतकऱ्यांचा ऊस दोन-तीन दिवसांत नेण्यासाठी प्रयत्न करतानाच वीज कंपनीनेही त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आमदार व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)