शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना उपचारांसाठी जगभरातील डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 14:34 IST

इंटरनेटच्या साह्याने व्हॉट्सअ‍ॅपसह विविध समाजमाध्यमांचा वापर

ठळक मुद्देसमाजमाध्यमांचा वापर : माहितीची देवाण-घेवाण, लक्षणांची चर्चा कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या बाळाला संसर्ग होत नाही

राजू इनामदार - पुणे : जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जगभरातील अनेक डॉक्टर रोजच्या रोज परस्परांच्या संपर्कात आहेत. त्यासाठी माहितीजालाच्या (इंटरनेट) साह्याने विविध समाजमाध्यमांचा (व्हॉट्सअ‍ॅप व अन्य) वापर करत आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांबरोबरच खासगी रुग्णालयातील या विषयाशी संबंधित तज्ज्ञांचाही यात समावेश आहे.रुबी रुग्णालयातील संसर्गजन्य आजार विभागातील तज्ज्ञ डॉ. अभिजित लोढा म्हणाले, मी स्वत: रोज अनेक देशांतील डॉक्टरांबरोबर बोलत असतो. ज्या देशात या आजाराचे रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर जास्त संवाद होत असतो. कोणत्या औषधांनी रुग्णाला फरक पडतो, कोणते औषध प्रभावी ठरते आहे, रुग्णांची लक्षणे, बरे होत असतील तर त्याची कारणे, आजार वाढत असेल तर त्याची कारणे या प्रकारचे संभाषण होत असते. त्याचा उपयोगही होत असतो.............कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या बाळाला संसर्ग होत नाहीडॉ. लोढा म्हणाले, संवादाबरोबरच जर्नल्स, संकेतस्थळांच्या माध्यमातूनही माहितीची देवाणघेवाण होत असते. गरोदर महिलेला कोरोना झाला असेल तर तिच्या बाळाला तो होतो का याविषयी काही दिवसांपूर्वी विचारणा होत होती. चीनमध्ये काही गरोदर महिलांची यादरम्यान प्रसूती झाली. त्यांच्या बाळांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे आता कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या बाळाला या आजाराचा संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले. ४त्याचप्रमाणे अमेरिकेतील एका महिला रुग्णाला एक नव्या प्रकारचे औषध दिले आहे. त्याचा परिमाण लवकरच कळेल. अमेरिकेतूनच एनईजेएम या नियतकालिकेच्या वतीने (न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिन) एक संकेतस्थळ चालवले जाते. त्यावर या आजाराबाबत सुरू असलेल्या संशोधनाची मिनिट टू मिनिट माहिती अद्ययावत केली जात असते..........

सतत जागृत राहावे लागते....महापालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव वावरे हेही परदेशातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर समाजमाध्यमांच्या द्वारे बोलत असतात. ते म्हणाले, सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे औषधोपचारांविषयी नवे काही आहे का याबाबत सतत जागृत राहावे लागते. रुग्णांची लक्षणे सारखी आहेत का, कोणत्या उपचारांनी फरक पडतो आहे याविषयी देवाणघेवाण होत असते. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसInternetइंटरनेटWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप