शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Coronavirus Vaccine : कोरोनावरील 'कोविशिल्ड' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ससूनमध्ये सोमवारपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 7:57 PM

भारतात सिरम इन्स्टिट्युटमार्फत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत..

ठळक मुद्देकोरोनावरील 'कोविशिल्ड' या लसीच्या जगभरात घेतल्या जात आहेत चाचण्या देशभरातील सुमारे १६०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार

पुणे : ससून रुग्णालयात 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सोमवार (दि. २१) पासून सुरूवात होणार आहे. यापूर्वीच भारती व केईएम रुग्णालयामध्ये या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीकडून कोरोनावरील 'कोविशिल्ड' या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्युटमार्फत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. पुण्यातील भारती हॉस्पीटलमध्ये दि. २६ ऑगस्टपासून चाचणीला सुरूवात झाली. त्यानंतर केईएम रुग्णालय आणि आता ससून रुग्णालयात या चाचण्या होणार आहेत. ससूनमधील चाचण्यांना सोमवारपासून सुरूवात होणार आहे. सध्या या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. काही जणांनी यापुर्वीच नोंदणी केली आहे. आणखी स्वयंसेवकांची गरज असून त्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे. सुमारे १५० ते २०० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.        दरम्यान, या लसीच्या चाचणीदरम्यान ब्रिटनमध्ये एका रुग्णावर विपरीत परिणाम झाल्याने काही दिवसांपुर्वी जगभरातील चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. पण काही दिवसांतच चाचण्यांना पुन्हा हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे ससून रुग्णालयातही चाचण्यांना सुरूवात होणार आहे. आता पुण्यातीलच तीन रुग्णालयांमध्ये लसीचे परीक्षण होणार आहे. देशभरातील सुमारे १६०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. पुढील चार ते सहा महिने या चाचण्या सुरू राहणार आहेत.-----------चाचणीत सहभागी होण्यासाठी संपर्क - ८५५०९६०१९६, ८१०४२०१२६७-----------ससूनमध्ये सोमवार (दि. २१) पासून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. सुमारे १५० ते २०० जणांवर चाचणी केली जाईल. त्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे. इच्छुकांनी रुग्णालयांशी संपर्क साधावा.- मुरलीधर तांबे, प्रभारी अधिष्ठाता, ससून रुग्णालय------------ 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल