coronavirus: police seized the corona mask rsg | coronavirus : पुण्यात पाेलिसांनी पकडला नामवंत कंपनीच्या मास्कचा साठा

coronavirus : पुण्यात पाेलिसांनी पकडला नामवंत कंपनीच्या मास्कचा साठा

पुणे : पुण्यात जादा दराने मास्क विक्री करणार्‍या दुकानांवर छापा घालून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मास्कचा साठा पकडला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने शहरात शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने मास्क विक्री करणार्‍या दुकानांवर बनावट ग्राहक पाठवले. जादा दराने मास्क विक्री करीत असल्याची खात्री झाल्यानंतर तेथे पोलिसांनी छापा टाकला आहे. 

नामवंत कंपनीच्या मास्कचा साठा तेथे आढळला असून त्याची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. संपूर्ण मोजणी होण्यास पहाट होण्याची शक्यता असून त्यानंतरच नेमका किती साठा येथे आहे, याची माहिती मिळू शकणार आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या तीन दिवसात सहार येथे दोन ठिकाणी छापे टाकून २५ लाख आणि ४ लाख मास्कचा बेकायदेशीर साठा जप्त केला होता. त्यानंतरची ही पुण्यातील मोठी कारवाई आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: police seized the corona mask rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.