शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 13:38 IST

लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नम्रता फडणीस

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून  ‘होम क्वारंटाईन’ झालेल्या व्यक्तींपुढं आता 14 एप्रिलपर्यंत करायचं काय? असा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेमुळे  व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी ’लोकमत’प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनीही या शक्यतेला काहीसा दुजोरा दिला असून, ‘मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

‘होम क्वारंटाईन’ मुळे कोणत्या मानसिक समस्यांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे?- पहिली म्हणजे  ‘चिंता’. कारण अनिश्चितता आली की चिंता येते. कुठलीही नकारात्मक भावना तिची तीव्रता, कालावधी आणि मग पुनरावुत्ती या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे भावनांचा माणूस म्हणून अनुभव हा येतचं असतो. पण या तीन गोष्टींना आजार कधी म्हणायचं तर यात वुद्धधी झाली तर अनिश्चिततेमुळे चिंता आपोआप वाढते. आपल्यावरची बंधन इतकी आहेत कि आपल्या परिघातल्या गोष्टी कमी झाल्या आहेत. दुसरं या चिंतेचे पर्यावसन हेनैराश्यात होऊ शकतं. कुठेचं काही मार्ग मिळत नाहीये. मग नैराश्य वाढू शकतं. तिसरं म्हणजे नातेसंबंधातील ताणतणाव यात भर पडू शकते. कारण शहरात लोकांना एकमेकांबरोबर राहाण्याची सवय नाहीये आणि मिळालेल्या वेळेचा विधायक उपक्रम करण्याचं टीम वर्क जर कमी पडलं तर नाते संबंधात तणाव हे पालक आणि मुलांच्या नातेसंबंधात देखील तणाव येऊ शकतात. चौथा भाग म्हणजे ज्यांना गतिमान आयुष्य जगण्याची सवय झाली आहे, त्यांना ही शांतता किंवा ही स्थितीशीलता खायला उठते. त्यातून मग चिडचिड होण्याचं प्रमाण वाढतं.या गोष्टी होणारचं. त्यात भर म्हणजे जे मानसिक रूग्ण आहेत त्यांच्या आजारातही वाढ होण्याची शक्यता आहे.

यातून मग व्यसनाधीनतेला आमंत्रण मिळू शकेल असं वाटतं का ?

- हो का नाही. घरी बसल्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडं स्टॉक आहे तोपर्यंत ती चालू राहाणार. किंबहुना त्यात वाढ होणार. मग ती तंबाखू, सिगरेट आणि दारू असू देत. लोक या शिकारीसाठी नक्कीच बाहेर पडणार. त्यामुळं व्यसनाधीनतेमध्ये होणारी वाढ आणि व्यसनाधीनता सक्तीनं बंद करावी लागल्यामुळं येणारे विड्रॉल हा देखील गंभीर मानसिक आजारचं आहे. कुणाला असा विड्रॉल आला तर ही उपचारासाठीची संधी आहे असं समजून जवळच्या रूग्णालयात दाखल व्हा.

सध्याच्या स्थितीत मानसिक आजाराला कसं टाळता येईल?- आता पालक आणि मुलांचंच उदाहरण पाहा. पालकांना मुलांना सतत घराबाहेर पिटाळण्याची सवय असते. मात्र आता मुलांना बाहेर जायला मिळत नाहीये. त्यामुळे पालकांसमोर  गहन प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पालक आणि मुलांमधील संवाद बळकट करण्याची ही चांगली संधी आहे. असं मानायला हवं. माध्यमांचाही योग्य पद्धतीनं वापर करायला हवा. वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या दिवसाचं योग्य नियोजन करा. विकास, विरंगुळ्यासाठी उपक्रम आखले पाहिजेत. स्क्रीन बंद करून एकमेकांसाठी वेळ द्यायला पाहिजे. एकत्र गाणं, पदार्थ बनविणं हे पातळीवर व्हायला हवं.

समाजाचं मानसिक स्वास्थ उत्तम राहाण्यासाठी मानसोपचार तज्ञांची यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे?- आम्ही तीन तास ओपीडी सुरू ठेवली आहे. एवढी बंधन असूनही रोज पाच ते सहा मानसिक आजाराशी संबंधित रूग्ण येत आहेत. आम्ही व्हॉटसअप आणि आॅनलाईनद्वारे समुपदेशन सुरू केले असून, जुन्या रूग्णांना आॅनलाईन प्रिस्क्रिप्शन पाठवत आहोत. नवीन जे रूग्ण येतील त्यांच्यासाठी कायकरायचं हा प्रश्न आहे. लोक येणार कसं? मग त्यांनी जवळच्या क्लिनिक मध्ये जाणं आणि मग आम्ही संबंधित डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन लिहून दे असं सांगण्याशिवाय पर्याय नाही.

शासकीय पातळीवर काय होणं आवश्यक आहे असं वाटतं?-आता तरी मानसिक आरोग्याचा वेगळा समावेश अत्यावश्यक सेवेत करायला हवा. आधीच मानसोपचार तज्ञांची संख्या कमी आहे. तसं केलं तर सावधानी ठेवून ओपीडी सुरू ठेवता येतील. काही ठिकाणी पोलिसांनी ओळखपत्र दिले आहे. पण सर्व ठिकाणी हे नाही.एमएमसीने प्रिस्क्रिपशन आॅनलाईन देण्याला परवानगी दिली आहे. पण आमची  शेड्यूल औषधे आहेत. केमिस्ट ही औषधे देत नाहीत. मानसिक रूग्ण घराबाहेर पडला तर पोलीस त्याला हे आवश्यक आहे का? असं म्हणतील म्हणून ही वरील मागणी आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMental Health Tipsमानसिक आरोग्य