CoronaVirus Live Updates : दिलासादायक! कोरोनामुक्त वाढले तिपटीने; सक्रिय रुग्णांची संख्या ४२६०
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:18 IST2021-05-23T22:13:27+5:302021-05-23T22:18:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेसातशे असणारी रुग्णसंख्या कालपेक्षा स्थिर आहे.

CoronaVirus Live Updates : दिलासादायक! कोरोनामुक्त वाढले तिपटीने; सक्रिय रुग्णांची संख्या ४२६०
पिंपरी - महापालिका परिसरात वाढलेला कोरोनाचा आलेख कमी होत असून कोरोनामुक्तांची तिपटीने संख्या वाढली. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४२०० वर आली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेसहाशेंवर आली आहे. ६५५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ हजार ९५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तीस जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेसातशे असणारी रुग्णसंख्या कालपेक्षा स्थिर आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार १०६ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी निगेटिव्ह अहवालांची माहिती आज उपबल्ध झाली नाही. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ४ हजार २६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सहा हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.
कोरानामुक्तांची वाढ कायम
पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आलेख तिपटीने वाढला आहे. एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ३६ हजार ३४८ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ७०९ वर गेली आहे.
३० जणांचा मृत्यू
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या निम्याने खाली आली आहे. मात्र, कालच्या तुलनेत दोनने मृतांची संख्या वाढली आहे. शहरातील ३० आणि शहराबाहेरील १४ अशा एकूण ४४ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या ३ हजार ८९२ वर पोहोचली आहे.
लसीकरणाचा आलेख वाढला
महापालिका परिसरात मागील आठवडयात लसीकरणाचा आलेख कमी झाला होता. आजपासून पुन्हा वाढला आहे. महापालिकेच्या बारासह एकूण ६५ केंद्रावर आज कोवीशिल्ड आणि कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला. ४ हजार ००४ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण ४ लाख ७७ हजार ३८९ जणांना लस दिली आहे.