शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Corona virus : तरुणांनो, सावधान... पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० दरम्यान सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:30 AM

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल अडीच हजारांवर..

ठळक मुद्देशहरातील बहुतांश भागात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष लक्ष केंद्रित करुन उपाययोजना मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा साधने वापरण्यावर भर देण्याचे आवाहन

लक्ष्मण मोरे पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल अडीच हजारांवर गेला असून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडाही दिडशेपर्यंत गेला आहे. कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजीच्या एकूण २२४५ रुग्णांपैकी १४७९ रुग्ण हे २० ते ६० या वयोगटातील आहेत. हे प्रमाण रुग्णसंख्येच्या ६५ टक्के एवढे आहे. या गटातील मृत्यूंचे प्रमाण मात्र कमी आहे.शहरात ९ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. ८ मे पर्यंत हा आकडा २२४५ पर्यंत गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १३६ वर गेला आहे. शहरात ० ते १०० वयोगटातील रुग्णांची तपशीलवार माहिती ठेवली जात आहे. त्यातही पुरुष, महिलांची वेगळी आकडेवारी काढली जात असून या वयोगटातील मृत्यूमुखी पडलेल्यांचीही नोंद ठेवली जात आहे. पालिकेकडील आकडेवारीनुसार, सर्वाधिक रुग्ण ४२२ रुग्ण हे ३० ते ४० या वयोगटातील आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण १८५ एवढे आहे. त्याखालोखाल २० ते ३० हा वयोगट असून या गटात एकूण ४२१ रुग्ण आहेत.पालिकेसह पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा साधने वापरण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील बहुतांश भागात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही हा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाच्यादृष्टीने सर्वाधिक संवेदनशील वयोगट म्हणून ५० ते ९० याकडे पाहिले जात होते. परंतू, २० ते ६० या वयोगटात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने या वयोगटातील नागरिकांनीही विशेष खबरदारी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.=======कोरोना बाधित रुग्ण (८ मेपर्यंत)वयोगट               स्त्री              पुरुष      एकूण0-10                    51                75        12610-20                  94              122       21620-30                 178             243      42130-40                 185            237       42240-50                159             200       35950-60                 142            135        27760-70                 92              108      20070-80                 41              53          9480-90                02              03         0590-100 -- -- --=========कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा तपशील (८ मेपर्यंत)वयोगट मृत्यू0-10     -               -10-20  -             -20-30  -           0730-40  -           0740-50  -           2050-60  -          3460-70  -           3870-80 -            1780-90 -            0390-100 -           -

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका