Corona virus : धक्कादायक! पुणे शहरातील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:23 PM2020-06-22T13:23:14+5:302020-06-22T13:28:13+5:30

आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्णांच्या आकड्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण

Corona virus : Shocking! Question marks on the number of critical corona patients in Pune city, discrepancies in hospital information | Corona virus : धक्कादायक! पुणे शहरातील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण

Corona virus : धक्कादायक! पुणे शहरातील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालयांच्या माहितीत तफावत , काही रुग्णालये ‘अपडेट’ होईनातविभागीय आयुक्त कार्यालयाने ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’ केले विकसित

राजानंद मोरे
पुणे : शासकीय व खासगी रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांची ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’वरील माहिती व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालातील आयसीयु बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरवरील रुग्णांबाबतच्या माहितीत मोठी तफावत आढळून येत आहे. रविवारी (दि. २१) दुपारपर्यंत सॉफ्टवेअरवर माहिती भरलेल्या केवळ १२ रुग्णालयांमध्ये ८० पैही एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. तर ५७६ रुग्ण ऑक्सिजनवर होते. पालिकेच्या शनिवारच्या अहवालानुसार व्हेंटिलेटरवर ५२ रुग्ण तर २७३ रुग्ण आयसीयुमध्ये व ऑक्सिजनवर होते. अद्याप दुपटीहून अधिक रुग्णालयांनी सॉफ्टवेअरवर माहिती अपडेट केलेली नाही. त्यामुळे आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्णांच्या आकड्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. त्यामध्ये पुण्यासह सातारा, कोल्हापुर, सांगली, सोलापुर या जिल्ह्यांमधील कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंंटरमधील उपलब्ध व रिक्त बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही माहिती सहज मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. रुग्णालयांकडूनच ही माहिती दररोज अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या सॉफ्टवेअरवर पुणे महापालिका कार्यक्षेत्रात दि. २१ जूनपर्यंत एकुण २६ कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटरची नावे आहेत.
-----------------
आकड्यांमध्ये तफावत
महापालिकेच्या अहवालानुसार शनिवारी शहरात २७३ रुग्ण गंभीर होते. त्यामध्ये ५२ व्हेंटिलेटरवर तर उर्वरीत आयसीयुमध्ये ऑक्सिजनवर होते. तर सॉफ्टवेअरवरील माहितीत रविवारी माहिती अद्ययावत केलेल्या १२ रुग्णालयांमध्येच ५७६ रुग्णांना ऑक्सिजन लावल्याचे दिसते. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन असलेले एकुण बेड ६२३ आहेत. तर व्हेंटिलेटर असलेल्या ८० आयसीयु बेडपैकी एकही बेड रिक्त नव्हता. तीच स्थिती व्हेंटिलेटर नसलेल्या ६४ आयसीयु बेडची होती.
----------------------
माहिती होईना अद्ययावत
सॉफ्टवेअरमध्ये नावे असलेल्या २६ कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटरपैकी
५ रुग्णालयांची काहीच माहिती उपलब्ध नाही. तर ९ रुग्णालयांची माहिती रविवारी अद्ययावत केलेली नव्हती. शहरातील एका नामांकित रुग्णालयाने तर सहा दिवसांपासून माहिती भरलेली नाही. विशेष म्हणजे कोविडसाठी असलेले शहरातील सर्वाधिक खाटा या रुग्णालयात आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअरचा उद्देश सफल होताना दिसत नाही.
------------
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सॉफ्टवेअरवरील पुणे महापालिका क्षेत्रातील एकत्रित माहिती (दि. २१ जून दुपारी ४ पर्यंत)

कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटर - २६
एकुण कोविड बेड - २३०२, रिक्त - ३६४
ऑक्सिजन नसलेले बेड - ७६४, रिक्त - ३६३
ऑक्सिजन असलेले बेड - १०५५, रिक्त - १४२
व्हेंटिलेटर नसलेले आयसीयु बेड - ९५, रिक्त - १
व्हेंटिलेटरसह आयसीयु बेड - १४५, रिक्त - ००
-------------------
सॉफ्टवेअरवरील रुग्णालयांची अद्ययावत माहिती (दि. २१ जून दुपारी ४ पर्यंत)
अद्ययावत माहिती भरलेली रुग्णालये - १२
व्हेंटिलेटरसह आयसीयु बेड - ८०, रिक्त - ००
व्हेंटिलेटर नसलेले आयसीयु बेड - ६४, रिक्त - ००
ऑक्सिजन असलेले बेड - ६२३, रिक्त - ४७
-----------
महापालिका दैनंदिन अहवाल (दि. २० जून)
एकुण गंभीर रुग्ण - २७३
आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्ण - २२१
व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ५२
-----------------------

Web Title: Corona virus : Shocking! Question marks on the number of critical corona patients in Pune city, discrepancies in hospital information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.