शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी १६३ नवीन रुग्ण; जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४२६ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 23:01 IST

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ११६ रुग्ण अत्यवस्थ

ठळक मुद्देशहरात १०९ रुग्ण झाले बरे : दिवसभर सहा रुग्णांचा मृत्यू, एकूण एक्टिव्ह रुग्ण १३३२

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये तब्बल १६३ रूग्णांची भर पडली असून १०९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ९८७ झाली असून प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १३३२ आहेत. दिवसभरात एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ११६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १६३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडू रुग्णालयात १३४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ८२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरुवारी सहा मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६९ झाली आहे. दिवसभरात एकूण १०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ५८ रुग्ण, ससूनमधील ०४ तर  खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १४८६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३३२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १४१४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २७ हजार ३४९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९५३, ससून रुग्णालयात ११० आणि खासगी रुग्णालयांमध्ये २६९ रुग्ण उपचार घेत आहेत. ......................................जिल्ह्यात एका दिवसांत आत्तापर्यंतची उच्चांकी म्हणजे १९४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ जिल्ह्यात गुरुवारी (दि.१४) एका दिवसांत आता पर्यंतची उच्चांकी म्हणजे १९४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर ६ रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात १८१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात ६७ दिवसापूर्वी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला. त्या दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांचा वाढत आलेख सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत. यामुळे काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या १९४ पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण वाढ पुणे शहरामध्ये असून, त्यानंतर कॅन्टोनमेन्टचा नंबर लागतो. यामुळे भविष्यात पुणे शहरावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ------ एकूण बाधित रूग्ण : ३४२६पुणे शहर :२९८५पिंपरी चिंचवड : १८०कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३०१मृत्यु : १८१

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर राम