शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:06 IST

महाराष्ट्र लुटून खा... आम्ही डोळेबंद करून बसतो...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'पार्थ'वरील पुण्यातील जमिन घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच, आता काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहेत. सनाईक यांनी मिराभाईंदरमध्ये  २०० कोटिंची जागा, ३ कोटिंमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते चंद्रपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते."...तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो, लुटा...!"-माझ्याकडे एक प्रकरण आले आहे. यासंदर्भात मी उद्या सविस्तर माहिती देणार आहे. सर्व्हेनंबरसह माहिती देतो. आपण यातही लक्ष घालावे. या राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे. मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षनिक संस्थेला मिराभाईंदरमधील ४ एकर प्राइम लँड, जिची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? आणि जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा...! असे म्हणायची वेळ आता आली आहे.

"तक्रार दिली, तर...!" -दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी, विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, "वडेट्टिवार कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलत आहेत, जर त्यांनी मला काही तक्रार दिली, तर..., हे लोक केवळ माध्यमांमध्ये बोलतात. प्रश्न असा आहे की, तक्रार द्यायला हवी ना. तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तसेही, परवाच्या घटनेवर (पार्थ पवार) कुणाची तक्रार नाहीये. पण आम्हाला ते प्रकरण समजल्यावर आम्ही कारवाई केली. त्यावर आम्ही चौकशी नेमली. आम्हाला ते आढळलं. आम्ही कारवाई केली."

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Saranaik Accused of Land Scam: Wadettiwar Alleges Massive Corruption

Web Summary : Congress MLA Vijay Wadettiwar accuses Minister Pratap Saranaik of acquiring prime land worth crores for a pittance. Wadettiwar challenges authorities to investigate the alleged scam, questioning governmental oversight. BJP's Bawankule urges formal complaint.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारpratap sarnaikप्रताप सरनाईकcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना