शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा २ हजार ३८० वर;शनिवारी तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 21:56 IST

वाढलेले रुग्ण आणि बरे झालेल्या शनिवारची रूग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक

ठळक मुद्देरुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये शनिवारी दिवसभरात तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ३८० झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल ९६ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. वाढलेले रुग्ण आणि बरे झालेल्या रूग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दिवसभारत एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  शनिवरी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १३५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडू रुग्णालयात १०७ तर खासगी रुग्णालयांमध्ये २३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी चार मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४० झाली आहे. दिवसभरात एकूण ९६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ७४, ससूनमधील १० तर  खासगी रुग्णालयांमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८२६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ४१४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ५४३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २१ हजार ८१३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १०११, ससून रुग्णालयात ११३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २९० रुग्ण उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका