शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:45 AM

पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ

ठळक मुद्देमृत्यू पावलेले सातही रुग्ण हे इतर आजाराने देखील त्रस्त

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या तासा-तासाने वाढत असताना, गुरूवारी मात्र ही वाढ आटोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहरात ३ एप्रिलपासून नित्याने दहा-वीस रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, गुरुवारी हे ही संख्या १२ वर आली आहे. यात मृत्यूचे सत्र अजून थांबले नसून गुरुवारी नव्याने ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले सातही रुग्ण हे इतर आजाराने देखील त्रस्त होते.  पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले़ गेल्या तीन-चार दिवसात हा आकडा वाढत असतानाच आज प्रथमच नव्याने संसर्ग झालेल्यांची संख्या कमी झाल्याचे आढळून आली आहे़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेकडो डॉक्टरांच्या पथकांमार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणीचे काम चालू सद्यस्थितीला चालू आहे़ पुणे शहरात ८ एप्रिलपर्यंत जे रूग्ण आढळून आले आहेत, त्यामध्ये  ढोले पाटील वार्डमध्ये १२, नगररस्ता येथे १, घोले रोड येथे ५, येरवडा येथे ८, औंध येथे ३, कोथरूड येथे १, सिंहगड रस्ता येथे ५, वारजे येथे १, धनकवडी येथे १२, हडपसर येथे ११, कोंढवा येथे ९, वानवडी येथे ३, कसबा पेठ येथे २३, बिबवेवाडी येथे ४ व सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे भवानी पेठ परिसरात आढळून आले असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या ही ४५ आहे़  पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये अधिक असल्याने हा सर्व भाग सील करण्यात आला असून, येथे प्रत्येक घरात कोरोना संसगार्बाबत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे़ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकूण ६६२ जणांना आजपर्यंत विविध विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते़ तर ३२३ जणांना त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते़ अशा एकूण ९८५ जणांना आत्तापर्यंत क्वारंटाईन करण्यात आले असून, यापैकी अनेकांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे़ सध्या पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ११८ कोरोनाबाधित उपचार घेत असून, ससून हॉस्पिटलमध्ये ही संख्या ३९ इतकी आहे़     शहरात आत्तापर्यंत १ हजार ८१५ संशयितांना तपासणीसाठी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते़ यापैकी १ हजार ५९४ जणांचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले़ तर कोरोनाची लागण झालेल्या व उपचारानंतर पूर्णत: बरे झालेल्या १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे़ यामध्ये नायडू हॉस्पिटलमधून १६ जणांना, सह्याद्री हॉस्पिटलमधून १ व भारती हॉस्पिटलमधून एका जणांचा समावेश आहे़  सद्यस्थितीला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक रूग्ण असून त्याची प्रकृती गंभीर आहे़

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूdoctorडॉक्टर