Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:13 PM2020-07-07T20:13:25+5:302020-07-07T20:16:46+5:30

पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.१२ टक्के

Corona virus : 1,262 new patients in Pune division; 30 died | Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू

Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देविभागातील २२ हजार ४८ बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी पुणे विभागातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ६७१

पुणे : पुणे विभागात १ हजार २६२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून विभागातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ६७१ झाली आहे. विभागात सध्या १३ हजार ३४२ ॲक्टीव रुग्ण असून आतापर्यंत एकूण १ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच विभागातील २२ हजार ४८ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७०२ रुग्ण गंभीर आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.१२ टक्के तर मृत्यूचे प्रमाण ३.४९ टक्के आहे, असे पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून मंगळवारी १ हजार २६२ नवे बाधित रुग्ण वाढले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार २२, सातारा जिल्ह्यातील ३८, सोलापूर जिल्ह्यातील १६०, सांगली जिल्ह्यातील २५ तर कोल्हापूर जिल्ह्यातील १७  रुग्णांचा समावेश आहे. विभागात ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने विभागातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २८१ झाली आहे.
 

पुणे जिल्हयात ३० हजार ४२५ बाधित रुग्ण असून  १८ हजार ३९५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण संख्या ११ हजार १३५ असून आतापर्यंत ८९५ रुग्णांचा कोरोनांने मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ४९४ रुग्ण गंभीर आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण ६०.४६ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २.९४ टक्के आहे.
 

सातारा जिल्हयात १ हजार ३७२ बाधित रुग्ण असून ९१३ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तसेच   साता-यात ५०४ ॲक्टीव रुग्ण असून एकूण ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सोलापूर जिल्हयात ३ हजार ३७१ कोरोना बाधित रुग्ण असून १ हजार ८२५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात १ हजार २४२ ॲक्टीव रुग्ण असून एकूण ३०४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 

सांगली जिल्हयात ५२० बाधित रुग्ण असून २७०  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सांगलीत ॲक्टीव रुग्ण संख्या २३७ असून आत्तापर्यंत एकूण १३ रुग्णांचा कोरोनांने मृत्यू झाला .तसेच कोल्हापूर जिल्हयात ९८३  बाधित रुग्ण असून ७४५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात २२४ ॲक्टीव रुग्ण असून एकूण १४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे,असेही म्हैसकर यांनी सांगितले.
 

Web Title: Corona virus : 1,262 new patients in Pune division; 30 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.