शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांसाठी आलिशान गाड्यांची सोय

By admin | Updated: August 5, 2015 03:30 IST

तालुक्यात काही किरकोळ प्रकार वगळता ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आज झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुपारी साडेतीनपर्यंत ७२.६२ टक्के

इंदापूर : तालुक्यात काही किरकोळ प्रकार वगळता ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आज झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुपारी साडेतीनपर्यंत ७२.६२ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख २९ हजार ५६४ मतदारांपैकी ९४ हजार ९० मतदारांनी मतदान केले. मतदार यादीतील चुकांमुळे वरकुटे खुर्द, लोणी देवकरच्या मतदान केंद्रांवर दोन गटात वाद झाले. मतदारांना मतदानासाठी आलिशान गाड्यांची सोय करण्यात आली होती. सर्वाधिक मतदान बळपुडी ग्रामपंचायतीसाठी (९५.२० टक्के), तर सर्वात कमी मतदान वालचंदनगर (४५.७४ टक्के) ग्रामपंचायतीसाठी झाले. मतदार यादीतील नावांच्या चुकांमुळे वरकुटे खुर्द व लोणी-देवकर ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रांच्या परिसरात दोन गटात वादावादी झाली. मात्र वृत्त लिहिपर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते.आज सकाळी साडेसात वाजता गावनिहाय मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत मतदान वेगाने झाले. दुपारी एकनंतर संथगतीने मतदान झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी गावातील निवडणूक लढवणाऱ्या दोन गटात चांगलीच ‘टस्सल’ असल्याचे चित्र होते. एरवी एसटी बस ही नशिबात नसणाऱ्यांच्या दिमतीला आलिशान चारचाकी गाड्या होत्या, त्याही मोफत. गलांडवाडी नंबर २ सारख्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांनी सामिष व शाकाहारी भोजनाची सोय केली होती. या निवडणुकीत लोणी-देवकर, वालचंदनगर, निमगाव केतकी, अंथुर्णे, कळस, कळंब, सणसर, लासुर्णे, निमसाखर या लोकसंख्या व राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या ग्रामपंचायतींचे सत्ताधीश ठरणार आहेत.(वार्ताहर)