शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्षाला ‘सौजन्याचे वावडे’

By admin | Updated: September 21, 2015 04:12 IST

सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. बऱ्याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्त्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पोलीस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही केले जात नाहीत. आपल्या भागात भांडणे सुरू असेल,रात्री उशिरापर्यंत स्पिकर सुरू असल्याने त्रास होत असेल, तर नागरिक १०० क्रमांकावर फोन करतात़ तेथील कर्मचारी मार्शलला अथवा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवितात़ त्यांना ज्यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर दिला जातो़ हे कर्मचारी तेथे गेल्यावर त्यांना फोन करुन तुमची काय तक्रार आहे, असे विचारतात़ या प्रकाराने तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड होत असल्याने पुढे तक्रार केली म्हणून त्यांनाच त्रास सहन करण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आली आहे़ जर एखादा गुन्हा, घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळवलीच, तर नियंत्रण कक्षाकडून माहिती देणाऱ्याचाच मोबाईल क्रमांक गस्तीवरील पोलिसांना (मार्शल) दिला जातो. घटनास्थळावर पोचल्यावर मार्शलवरील पोलीस सर्वांत आधी माहिती देणाऱ्याला फोन करतात. त्यालाच नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सध्या काही पोलीस ठाण्यांमधून संलग्न केलेले अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. तर काही जण शहरात बदलून आलेले आहेत; मात्र त्यांना अद्याप ‘पोस्टिंग’ मिळालेले नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिन ‘पोस्टिंग’च दिसत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे त्यांचे लक्ष नाही. यासोबतच नियंत्रण कक्षाचे काही कर्मचारी व अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या दर महिन्याच्या ‘सेवे’मध्ये मग्न असल्यामुळे आम्हाला काय कुणाची भीती, अशा अविर्भावात वावरत आहेत.