कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:56 IST2026-03-18T18:55:51+5:302026-03-18T18:56:36+5:30

सलगपणे ४ वाहनांना जोरदार धडक देऊन कंटेनर डाव्या बाजूला उलटला. एका कारवर जाऊन पडला त्यावेळी कारमधील सर्वजण दबले गेले

Container driver loses control; hits 5 vehicles, three killed in horrific accident on Mumbai-Pune Expressway | कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याच्या जवळ बुधवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. मृतांमध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. अपघातात अंबादास दामू पेटारे (रा. सिंहगड रोड, पुणे), श्रीकांत अनंत जाधव (वय ६३, रा. पुणे), प्रमोद संतोष पवार (रा. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.

द्रुतगती महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास काळाने घाला घातला. चालक अवधेश यादव हा पुण्याहून मुंबईला कंटेनर (क्र. एमएच- ४३, सीई- ३२८९) घेऊन चालला होता. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ आल्यावर उतारावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि या भरधाव कंटेनरने समोर असलेल्या वाहनांना एकापाठोपाठ एक धडक देण्यास सुरुवात केली. सलगपणे चार वाहनांना जोरदार धडक देऊन कंटेनर डाव्या बाजूला उलटला. एका कारवर जाऊन पडला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वजण दबले गेले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. त्यात तिघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यात कंटेनरचालक अवधेश यादवचाही समावेश आहे.

अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी

अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा, खोपोली पोलिस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकाकडून तत्काळ बचावकार्य सुरू केले. भीषण अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.

 

Web Title : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर कंटेनर अनियंत्रित, दुर्घटना में तीन की मौत

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर आडोशी सुरंग के पास कंटेनर अनियंत्रित होकर पांच वाहनों से टकरा गया, जिससे तीन लोगों की मौत हो गई और पांच घायल हो गए। मृतकों में पुणे के तीन लोग शामिल हैं। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Container loses control on Mumbai-Pune Expressway; three dead in accident.

Web Summary : Three people died and five were injured on the Mumbai-Pune Expressway near Adoshi tunnel after a container lost control and hit five vehicles. The deceased were from Pune. Police are investigating.