शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

ग्राहक न्यायालयाकडे नाहीत पोस्टासाठी पैसे : निर्णय पाठविण्यास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:03 IST

जिल्हा ग्राहक मंचाकडे पैसेच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून संबंधितांना आदेशाची प्रत पाठविणे शक्य झालेले नाही.

ठळक मुद्देबाजूने निकाल लागूनही न्याय मिळण्यास होतोय अडथळा

पुणे : ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची प्रत प्रतिवादीला पाठविण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाकडे पैसेच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून संबंधितांना आदेशाची प्रत पाठविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मंचामध्ये न्याय निर्णय होऊनही प्रतिवादींना आदेशाची प्रत न मिळाल्याने न्याय मंचाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदेशानंतर दोन महिन्यांनीदेखील सहस्रबुद्धे यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना आदेशाची मूळ प्रत मिळाली नसल्याचे कारण कंपनीने दिले. तसेच, आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ असल्याचे कंपनीने सांगितले. सहस्रबुद्धे यांनी जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता कार्यालयाने प्रतिवादीस मूळ प्रत पाठविली नसल्याचे मान्य केले. पोस्टेजसाठीचे पैसे उपलब्ध नसल्याने २ महिन्यांपासून अनेक प्रकरणांमध्ये निकालाची मूळ प्रत पाठवली नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.  निकालाची मूळ प्रत, आदेश असूनही तो ४५ दिवसांत न पाठविल्याने ग्राहक मंचच्या निर्णयाचा त्यांच्याच कार्यालयाकडून अवमान झाला आहे. त्यामुळे साठ दिवस उलटूनही नुकसानभरपाईची रक्कम ग्राहकास मिळाली नाही. तसेच, प्रतिवादीसदेखील व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच, प्रतिवादीस वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी असलेली मुदतदेखील संपुष्टात आली असण्याची शक्यता आहे. तब्बल चार लाख कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या राज्य सरकार ग्राहक मंचाला पोस्ट खर्चाचे पैसे उपलब्ध करून देता येत नसेल, तर ती सरकारवरील नामुष्की असल्याची प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी दिली. .............

अंमलबजावणी निकालानंतर ४५ दिवसांत करावीसजग नागरिक मंचचे कार्यकर्ता विश्वास सहस्रबुद्धे यांनी दि. १० जानेवारी २०१७ रोजी युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, पुणे व हेल्थ इंडिया टी. पी. ए. मुंबई या कंपन्यांवर त्यांना आजारपणाच्या विम्याची रक्कम मिळावी, यासाठी दावा दाखल केला होता. ग्राहक मंचाने त्या दाव्याचा निकाल १० जुलै २०१९ रोजी सहस्रबुद्धे यांच्या बाजूने दिला. मंचाने ९ टक्के व्याजासह २.८० लाख रुपये देण्याचा आदेश दिला. व्याजाची आकारणी २१ आॅगस्ट २०१५ पासून करावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी ३० हजार रुपये द्यावेत, असेही आदेशात नमूद केले होते. या आदेशाची अंमलबजावणी निकालानंतर ४५ दिवसांत करण्यास बजावले होते....... 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPost Officeपोस्ट ऑफिस