शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे, जलतरण तलाव अजूनही सुरूच

By admin | Updated: July 15, 2014 03:54 IST

शहरात आजपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, तसेच हॉटेलमधील शॉवर बाथ बंद करण्याची भीम गर्जना

पुणे : शहरात आजपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, तसेच हॉटेलमधील शॉवर बाथ बंद करण्याची भीम गर्जना महापालिका आयुक्तांसह महापौरांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. मात्र, त्याची अंमलबजाणी आज शहरात कोठेच दिसून आली नाही. विशेष म्हणजे याबाबतचे आदेश घोषणा केल्यानंतर तत्काळ काढणे अपेक्षित असताना, आज दुपारनंतर महापालिका आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही आस्थापनेस पालिकेस सूचना देता आल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे पुणेकरांच्या तोंडचे पाणी कमी झाले असले, तरी वरील सर्व ठिकाणी आज दिवसभर पाण्याचा वापर राजरोसपणे सुरूच असल्याचे शहभर दिसून आले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठलेला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठी १५ आॅगस्टपर्यंत राखीव ठेवण्यासाठी महापालिकेकडून शहराला दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे हा निर्णय घेतानाच पालिकेने पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी शहरातील बांधकामे तत्काळ थांबविणे, शहरातील सर्व वॉशिंग सेंटर बंद करणे, जलतरण तलाव बंद करणे, तसेच पंचतारांकित हॉटेलमधील बाथ टब आणि शॉवरच्या वापरावर नियंत्रण आणणे असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मागील आठवड्यात शुक्रवारी महापालिका आयुक्त विकास देशमुख आणि महापौर चंचला कोद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केला. मात्र, गेल्या दोन दिवसांत निर्णय अंमलबजावणीबाबत काहीच हालचाल करण्यात आली नाही. पालिका बंद असल्याचे कारण पुढे करीत त्याबाबत कोणतेही लेखी आदेश काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या आदेशाचा आज फज्जा उडाला. शहरात सर्वत्र जलतरण तलावांसह बांधकामे सुरूच होती. तसेच वॉशिंग सेंटरच्या बाहेरही वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे प्रशासनालाच पालिका आयुक्तांच्या आदेशाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)