शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नाल्यांवर बांधकामे, सिमेंटीकरण, अरुंद नदीपात्र! पाण्याची वाट बुजवली अन् पुराने शहराची वाट लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:24 IST

शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही

पुणे : शहरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याचे ‘आरोग्य’ बिघडले असून, त्यामुळे संततधार पावसामुळे देखील पुण्याचे जनजीवन विस्कळीत होत आहे. पाणी वाहून नेण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याने पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. ही प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी पुणेकरच जबाबदार आहेत. कारण अनेकांनी नाल्यांवर बांधकामे केली, सिमेंटीकरण केले, नदीपात्र अरुंद,  नाले बदलले. परिणामी पावसाच्या पाण्याला वाटच मिळत नाही.(Pune Heavy Rain) 

काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पाच-पाच दिवस संततधार पाऊस पडत असे. तरीदेखील कुठेही पूरस्थिती निर्माण व्हायची नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये या घटना नेहमी होत आहेत. कमी वेळेत अधिक पाऊस म्हणजे ढगफुटीसदृश पावसानेही यापूर्वी पुणे तुंबले आहे. परंतु, बुधवारी रात्रीपासून मात्र जोरदार पाऊस नव्हता. केवळ संततधार होता. त्यानेही पुण्याची अवस्था बिकट बनली. त्याचाच अर्थ पुणे शहराची पावसाला तोंड देण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत, भूमिगत झरे आणि नाल्यांचे मार्ग बदलले आहते. परिणामी पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले. या सिमेंटीकरणाच्या बांधकामामुळे शहरातील ४५ टक्के लहान-मोठे जलस्रोत गायब झाले आहेत. जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहांना धक्का लागला आहे, परिणामी पुराचा धोका वाढत आहे. संततधार पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, काही ठिकाणी संरक्षक भित कोसळली. सिंहगड रस्त्यावर तर पाणीच पाणी झाले. पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने, वाहून जाण्यासाठीचे मार्ग बंद केल्यानेच पुराचा धोका वाढत आहे.

जलस्त्रोत नाहीसे !

भूगोल व जलस्त्रोताचे अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिओग्राफिक इन्व्हायर्नमेंट ऑफ पुणे ॲन्ड सराऊंडिग’ या विषयावर संशोधन केले आहे. पुणे शहरात गेल्या तीन दशकांत तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत नाहीसे झाले आहेत. शहरात संततधार तर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. दिवसभरात १०० मिमी पाऊस झाला. खरंतर पाणी खूप मुरलं पाहिजे, जे मुरत नाही. केवळ ५ टक्के पाणी मुरत आहे. ९५ टक्के पाणी वाहून जाते. आता नाले कमी झाले. पाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा नाल्यात घाण अडते आणि तुंबते. ते काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते, अशी माहिती डॉ. गबाले यांनी दिली.

पाणी का साठते त्याची कारणे ?

- शहरातील नाले अरूंद झाले

- वाटेल तसे नाले-ओढ्यांचे मार्ग बदलले- टेकडी उतारावरील प्रवाह अडवले

- पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत- नाले, ओढ्यात राडारोडा टाकल्याने पाणी तुंबते

- नाल्यात बऱ्याचदा खूप कचरा टाकल्याने पाणी तुंबतो- सिमेंटीकरणामुळे पाणी जिरणे कमी झाले

- ९५ टक्के पावसाचे पाणी वाहून जाते

...मग पूर येणारच ना !

शहरामध्ये सिमेंटीकरणामुळे रस्ते गुळगुळीत बनले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. नाले गायब केले असून, तिथे इमारती उभ्या आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. सिंहगड परिसरात तर अशाप्रकारचे बांधकाम खूप आहे. खरंतर शहरामध्ये पाणी तुंबण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. शहरातील रस्ते तयार करताना या पावसाच्या पाण्याचा विचार केलेला नाही. पाऊस पडल्यानंतर २५ ते ३० टक्के पाणी जमिनीत मुरते. पण आता केवळ ५ टक्के पाणी मुरते. बाकीचे रस्त्यावरून वाहते. मग पूर येणारच आहे.

स्वतंत्र विभाग हवा !

शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही. महापालिकेने योग्य नियोजन करुन पाणी मुरण्यासाठी उपाय करणे अपेक्षित आहे. त्यासाठी धोरण ठरवायला हवे. महापालिकेत त्यासाठी स्वतंत्र विभागच हवा. त्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल. शहरातील पूरस्थितीबाबत नुकतेच एक चर्चासत्र झाले. त्यातही नगररचना करताना त्याविषयाचा एक विभागच हवा आणि केवळ या आपत्तीवर काम करणारा हवा, अशी मागणी झाली होती.

- शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट. नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर.

- ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते.

- शहरातील ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकenvironmentपर्यावरण