शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील विजयी

By admin | Updated: February 18, 2017 02:47 IST

इंदापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील यांचा विजय झाला. काँग्रेस पक्षाचे भरत शहा व राष्ट्रवादी

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील यांचा विजय झाला. काँग्रेस पक्षाचे भरत शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीधर बाब्रस यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.बाब्रस यांच्या निवडीच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या माजी कर्मचाऱ्यास नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीसाठी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा बोलविली होती. त्या सभेत निवडणूक व नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने धनंजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस वतीने हेमलता माळुंजकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती. हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही उमेदवारांना समान प्रत्येकी नऊ मते मिळाली. त्यानंतर १ डिसेंबर २०१६च्या शासन निर्णयानुसार नगराध्यक्षांना एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने नगराध्यक्ष शहा यांनी एक जादा मत पाटील यांच्या पारड्यात टाकल्याने धनंजय पाटील यांचा विजय झाला.स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे माजी कर्मचारी बाब्रस म्हणाले, की एक कर्मचारी व नागरिक म्हणून मला दोन्ही समाज घटकांच्या समस्यांची चांगल्या प्रकारे जाण आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याकरिता आपण पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणार आहोत. सुवर्णा मखरे, अनिता धोत्रे, धनंजय पाटील, जगदीश मोहिते, रजिया शेख, मीना मोमीन, कैलास कदम, मनीषा शिंदे, अनिकेत वाघ, स्वप्निल राऊत, हेमलता माळुंजकर, उषा स्वामी, अमर गाडे, पोपट शिंदे, राजश्री मखरे, गजानन गवळी, मधुरा पवार यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. इंदापूर नगरपरिषदेची निर्धारित सदस्य संख्या १८ आहे. त्यानुसार स्वीकृत नगरसेवकांसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते कैलास कदम यांनी भरत शहा यांचे तर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांनी श्रीधर बाब्रस यांच्या नावांचे प्रस्ताव दिले होते. प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी हेमंत निकम यांची त्यांच्या अर्जांची छाननी केली. दोन्ही अर्ज वैध ठरले. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाचे काम करण्याचे पाणी, वीज व रस्ते या प्रमुख गरजा पूर्ण करण्याकडे आपण लक्ष देणार असल्याची ग्वाही धनंजय पाटील यांनी दिली. तर पारदर्शी कारभार करताना शहराच्या सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी पक्षीय राजकारण कटाक्षाने बाजूला ठेवले जाईल, अशी प्रतिक्रिया भरत शहा यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)