शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भोर खरेदी-विक्री संघावर काँगे्रसचेच वर्चस्व

By admin | Updated: June 29, 2015 23:52 IST

तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्र्री संघाच्या व्यक्ती सभासद प्रतिनिधी या मतदारसंघात एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँगे्रचे उमेदवार शिवाजी नाटंबे

भोर : तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्र्री संघाच्या व्यक्ती सभासद प्रतिनिधी या मतदारसंघात एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँगे्रचे उमेदवार शिवाजी नाटंबे यांनी राष्ट्रवादीच्या सोमनाथ सोमाणी यांचा १०५ मतांनी दणदणीत पराभव केला. यापूर्वीच बिनविरोध झालेल्या सर्व १६ जागा काँगे्रसच्या असल्याने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून खरेदी-विक्री संघावर पुन्हा एकदा आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखले आहे. भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १७ जागांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १८ उमेदवारी अर्ज बाद झाल्याने २५ अर्ज शिल्लक राहिले होते. तर, ७ जणांनी माघार घेतल्याने १७ पैकी १६ जागा बिनविरोध झाल्या. या सर्व जागा काँगे्रसच्या आहेत. विविध मतदारसंघात बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे व जागा खालील प्रमाणे : विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघ (१० जागा) बाळू शिंदे, राजेंद्र सोनवणे, शंकर मालुसरे, अरविंद सोंडकर, बापू लेकावळ, काळुराम मळेकर, शरद पडवळ, हनुमंत शिरवले, राजेंद्र घोलप, सोपान म्हस्के; संस्था प्रतिनिधी मतदार संघ (एक जागा) अतुल किंद्रे; अनुसूचित जाती जमाती मतदार संघ (एक जागा) दत्तात्रय कांबळे; महिला प्रतिनिधी (दोन जागा) मनीषा बाठे, नंदा बोडके; इतर मागास प्रवर्ग(एक जागा) ज्ञानेश्वर झोरे, विमुक्त जाती जमाती (एक जागा) ज्ञानेश्वर भोसले हे बिनविरोध निवडून आले आहेत. निकाल जाहीर झाल्यावर कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या हस्ते कॉँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले, दिलीप बाठे, अशोक शिवतरे व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)व्यक्ती सभासद प्रतिनिधी मतदारसंघात एका जागेसाठी काँगे्रसकडून शिवाजी पांडुरंग नाटंबे व राष्ट्रवादीकडून सोमनाथ हिरालाल सोमाणी यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात एकूण ४४९ मतदार होते. त्यापैकी सरासरी १९६ मतदार मयत व बाहेर गावी असल्याने २६३ पैकी २३२ मतदारांनी मतदान केले. तर, एक मत बाद झाले. त्यात शिवाजी नाटंबे यांना १६८, तर सोमनाथ सोमाणी यांना ६३ मते मिळाली. यामुळे नाटंबे १०५ मतांनी निवडून आले. बिनविरोध झालेल्या १६ जागा निवडणूक लागलेली एक, अशा जागांच्या निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी श्रीमती ए. बी. पवार यांनी जाहीर केली.