शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य स्वराज्य संकल्पना रुजावी

By admin | Updated: February 14, 2015 23:55 IST

सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.

पुणे : ‘‘सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. असे परावलंबन माणसाला गुलाम बनविते. यातून लोकांना मुक्त करण्यासाठी आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजण्याची गरज आहे. यातून केवळ उपचार नाही, तर आरोग्याविषयी जनजागृतीचा ध्यास घ्यायला हवा,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.मुकुंदनगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या २६व्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांना विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग यांनी ही पदवी स्वीकारली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. अभय बंग उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी विद्यापीठाचे कुलपती निवृत्त न्यायाधीश विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८४ जणांना पीएच.डी. पदवी, तर विविध विद्याशाखांतील एकूण ४४५६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आली. विविध विषयांत प्रथम आलेल्या पाच जणांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले.डॉ. बंग म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांमधील स्वराज्य हा समान दुवा होता. हा वसा आता आम्ही घेतला आहे. या संकल्पनेला आरोग्याशी जोडून ‘आरोग्य स्वराज्या’चे ध्येय निश्चित करून काम सुरू केले. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात काम करताना तेथील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानाची जोड देत सेवा व संशोधनात समन्वय साधला. आरोग्य स्वराज्य या संकल्पनेची ताकद खूप मोठी आहे. आज आपल्या समाजात चंगळवाद फोफावला आहे. आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच समाजात आरोग्याबाबत परावलंबित्व निर्माण होत आहे. यातून बाहेर काढण्यासाठी चांगल्या उपचारांची गरज नाही, तर आरोग्याविषयी जागृत करणे गरजेचे आहे.’’सर्वसामान्यांना रुचेल असे संशोधन करण्याची अपेक्षा डॉ. ढवळीकर यांनी व्यक्त केली. विश्वसनीय पुराव्याअभावी केलेले संशोधन टिकत नाही. मुंबई येथे झालेल्या सायन्स काँग्रेसमध्ये असेच अविश्वसनीय पुराव्यांच्या आधारे संशोधन मांडण्यात आल्याचे डॉ. ढवळीकर यांनी सांगितले. पळशीकर व डॉ. टिळक यांनीही मनोगत व्यक्त केले.४आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात. ४पण, खरे तर आदिवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, ‘‘शिक्षण व सुसंस्कृतपणाचा कवडीचाही संबंध नाही.४आदिवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रियांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामूहिक असते.’’