शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदाराने विकसित केल्या संगणकप्रणाली

By admin | Updated: May 12, 2015 04:29 IST

केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या पोलीस हवालदाराने उच्चविद्याविभूषित संगणक अभियंत्यांनाही मागे टाकेल, अशा एक नव्हे तर तब्बल ९

पुणे : केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या पोलीस हवालदाराने उच्चविद्याविभूषित संगणक अभियंत्यांनाही मागे टाकेल, अशा एक नव्हे तर तब्बल ९ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. संगणकाचे तंत्रज्ञान आत्मसात करून या पोलीस कर्मचाऱ्याने शस्त्र परवान्यांपासून ते परकीय नागरिक नोंदणीपर्यंतचे सर्व अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी या प्रणाली विकसित केल्यामुळे पोलीस दलाचे लाखो रुपये वाचले आहेत. संगणक क्षेत्रामध्ये नवीन आणि वेगळे काही तरी करण्याची धडपड करणाऱ्या या पोलिसाचे नाव आहे रवींद्र नानासाहेब इंगवले. पोलीस आयुक्तालयामध्ये इंगवले यांना त्यांचे मित्र गमतीने ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ म्हणून हाक मारतात. पुण्याजवळच्या नांदेड गावाचे ते मूळचे रहिवासी. विज्ञान शाखेमधून बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नोकरी शोधावी लागली. १९९४मध्ये बिनतारी संदेश विभागात त्यांची नेमणूक झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या इंगवले यांनी १९९९मध्ये सी-डॅक संस्थेमधून संगणक प्रशिक्षण घेतले. दरम्यान, त्यांची बदली पुणे शहर पोलीस दलामध्ये झाली. तेथे त्यांनी शस्त्र परवान्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी संगणक प्रणाली त्यांनी तयार केली. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी इंगवले यांच्यामधील तंत्रज्ञानाची आवड लक्षात घेतली. पुण्यामध्ये सहआयुक्त म्हणून आलेल्या सिंघल यांनी इंगवले यांना पुणे शहर पोलीस दलामध्ये सामाविष्ट करून घेतले. त्यानंतर इंगवले यांनी वेगवेगळ्या स्वरूपांच्या ९ प्रणाली विकसित केल्या. साधारणपणे १९३२ ते २०१४ या कालावधीमधील शस्त्र परवान्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन त्यांच्या प्रणालीमुळे करणे सोपे झाले.पूर्वी हॉटेल परवान्यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या जात होत्या. परवान्यांची मुदत संपली, की पुन्हा जुने बाड शोधण्याचे किचकट काम सोपे करण्यासाठीठीही त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले. यामुळे मुदत संपलेल्या परवान्यांसाठी पोलिसांकडून वेळेत नोटिसा जाऊ लागल्या. यासोबतच पोलिसांच्या घरांबाबतची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली. किती पोलीस वसाहती आहेत, या वसाहतींमधील खोल्यांमध्ये सध्या कोण राहते, यासाठी त्यांनी एक संगणक अ‍ॅप्लिकेशन तयार केले. गणेशोत्सवामध्ये पोलिसांना मदत केलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांच्या कामाचे वाटप याकरिता इंगवले यांनी दोन दिवसांत प्रणाली तयार केली. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पीपीएफ पावत्या देण्यासाठी संगणकप्रणाली तयार केली. मंत्रालयाशी होणाऱ्या पत्रव्यवहार तसेच प्रस्तावांची सविस्तर माहिती ठेवणारी एक यंत्रणा त्यांनी तयार केली. यासोबतच मुंबईच्या राज्य राखीव पोलीस दलाकरिता पोलीस कर्मचारी व्यवस्थापन संगणकप्रणाली, बिनतारी विभागासाठी बिनतारी पोलीस भरती प्रक्रिया, पोलीस शिपाई अंतिम परीक्षा प्रक्रिया प्रणाली, तांत्रिक सुटेभाग व्यवस्थापन प्रणाली, चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती प्रणालीही त्यांनी विकसित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस मॅन्युएलच्या मराठीकरणाचे संगणकीकरण करण्यासाठीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. (प्रतिनिधी)