तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण

By Admin | Updated: June 6, 2015 22:00 IST2015-06-06T22:00:45+5:302015-06-06T22:00:45+5:30

निघोटवाडी-लांडकमळा येथील आवळीच्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम मोरडे फुडस् प्रा. लि. च्या माध्यामातून नुकतेच पूर्ण झाले.

Completion of pond mud removal | तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण

तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण

मंचर : निघोटवाडी-लांडकमळा येथील आवळीच्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम मोरडे फुडस् प्रा. लि. च्या माध्यामातून नुकतेच पूर्ण झाले. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
मोरडेवाडी आणि लांडकमळा या दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील तलावातील गाळ काढला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय अधिकारी-कल्याण पांढरे तहसीलदार, बी.जी. मोरे, गटविकास अधिकारी श्रीमती जगताप, मोरे फुडस्चे संचालक हर्षल मोरडे, किशोर मोरडे, तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव, निघोटवाडीच्या सरपंच संगीता गोसावी, उपसरपंच शिवाजी निघोट, ग्रामपंचायत सदस्य सुमंता निघोट, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वाकडे, मंचर ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, मोरडे फूडस् पदाधिकारी संदीप एरंडे, नरेंद्र धुमाळ, मंडल कृषी अधिकारी पी. एम. चासकर, कृषी सहायक आर. आर. शिंदे, डी. एस. ठाकुर, मंडल अधिकारी मंचर दीपक मडके, तलाठी हेमंत भागवत, इलग, गारकर, चव्हाण, उपविभागीय कार्यालयाचे जावळे व मोरडेवाडीचे आणि निघोटवाडीचे संदीप पडवळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

- मोरडे फूडस् प्रा. लि. च्या माध्यमातून ३ बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. बंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाणी साठा १ कोटी ८५ लाख लिटरने वाढणार आहे. शेवाळवाडी येथील पाणवठ्याच्या बंधाऱ्यात २५ लाख लिटर तर शेटेमळा येथील बंधाऱ्यातील गाळ काढल्याने ४७ लाख ३२ हजार लिटर पाणीसाठा वाढणार आहे. शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. यामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल, असे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Completion of pond mud removal